Share

…म्हणून मी शरद पवारांना कधीही जाणता राजा म्हणत नाही : सदाभाऊ खोत

Published On: 

जळगाव –  माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार आणि राज्य सरकारवर यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. उसाच्या एफआरपीच्या मुद्द्यावरून राज्य सरकार शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहे. एफआरपीचा चेंडू केंद्र सरकारच्या कोर्टात ढकलून एफआरपीचे तीन तुकडे करण्याचा राज्य सरकारचा डाव आहे. यामागे महाविकास आघाडीचे नेते तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांचा हात आहे असा आरोप देखील खोत यांनी केला आहे.

पंचायत राज समितीच्या दौऱ्याच्या निमित्ताने सदाभाऊ खोत दोन दिवसांपासून जळगाव जिल्ह्यात आले आहेत. त्यांनी मंगळवारी रात्री भाजपच्या वसंतस्मृती कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश भोळे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रंजना पाटील उपस्थित होत्या. केंद्र सरकारने पारित केलेले 3 नवीन कृषी कायदे, उसाची एफआरपी, आरोग्य विभागाचा कारभार अशा विविध विषयांवर त्यांनी मते मांडत राज्य सरकारला लक्ष्य केले.

यावेळी बोलताना खोत म्हणाले, राज्यसरकारचा त्यांचा हा डाव आम्ही हाणून पाडू. शरद पवार हे जाणता राजा नाहीत. ते उद्योजकांचे नेते आहेत. त्यांच्या मुखात राम तर बगलेत सुरी असते, अशा शब्दांत खोत यांनी शरद पवारांवर टीका केली. शरद पवारांनी कधीही शेतकऱ्यांची बाजू घेतली नाही. म्हणून मी त्यांना कधीही जाणता राजा म्हणत नाही. ते त्यांच्या आत्मचरित्रात म्हटल्याप्रमाणे वागत नाहीत. शेतकऱ्याचा खजिना लुटण्यात ते माहीर आहेत. म्हणूनच त्यांनी राज्य सरकारच्या वतीने उसाच्या एफआरपीचे तीन तुकडे करण्यास केंद्राला सांगितल्याचा आरोपही सदाभाऊ खोत यांनी यावेळी केला.

राज्य सरकारची एफआरपीबाबत असलेली भूमिका दुटप्पी आहे. याबाबत आम्ही लवकरच एल्गार पुकारणाऱ्या आहोत. एफआरपीच्या मुद्द्यावरून आम्ही लवकरच साखर आयुक्तालयासमाेर निदर्शने करणार आहोत. हा मुद्दा केंद्राकडेही प्राधान्याने मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!