Share

मांजरा नदीच्या पुरात अडकलेल्या तिघांना हेलिकॉप्टरच्या सह्याने सुखरूप बाहेर काढले

Published On: 

लातूर : मांजरा नदीच्या पाण्यात पोहरेगाव येथील शेतात अडकलेल्या नागोराव किसन टिकणारे (५०), पत्नी रुक्माबा (४५) आणि त्यांचा मुलगा चंद्रकांत (११) यांची भारतीय वायू सेनेच्या हेलिकॉप्टरच्या मदतीने यशस्वीरित्या सुटका करण्यात आली आहे. मांजरा नदीच्या पुरामुळे अनेक नागरिक अडकले आहेत. त्यांना सोडवण्यासाठी एनडीआरएफची टीम तैनात करण्यात आली आहेत.

मंगळवारी सायंकाळी हे हेलिकॉप्टर लातूर विमानतळात दाखल झाले होते. सदरील शोध व बचाव मोहीम पालकमंत्री अमित देशमुख व जिल्हाधिकारी पृथ्वीराज यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. ही कामगिरी भारतीय वायुसेनेचे पायलट प्रतीक बऱ्हाणंपुरे आणि त्यांच्या पथकाने पार पाडली. जिल्हाधिकारी यांच्या सुचनेवारून हेलिकॉप्टर सोबत मार्गदर्शनासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी साकेब उस्मानी हे उपस्थित होते.

मांजरा नदीच्या पाण्यामुळे अडकलेल्या नागरिकांना मंगळवारी देखील सुखरुप बाहेर काढण्यात आले होते. त्यासाठी बोटीचा वापर करण्यात आला होता. धरणात पाण्याची आवक कमी झालेली असली तरी पुढीक काळात आणखी पावसाचा इशारा देण्यात आलाय. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!