Share

नवज्योत सिंग सिद्धू यांच्या राजीनाम्याबाबत मला काहीच माहिती नाही – चरणजीतसिंग चन्नी

Published On: 

अमृतसर : पंजाब कॉंग्रेसमध्ये पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप झाला असल्याचे पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी पंजाबचे मुख्यमंत्री असणारे कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता. तर आता पंजाबचे कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष असणारे नवज्योत सिंग सिद्धू यांनी त्यांच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे.

मात्र, आपण काँग्रेसमध्येच राहणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. सिद्धू यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, ते काँग्रेस पक्षाचे सदस्य राहतील. काल पंजाबमध्ये नवीन मंत्र्यांचे खातेवाटप झाले आहे आणि काही तासांनंतर सिद्धू यांनी सोनिया गांधींना आपला राजीनामा पाठवला आहे.

दरम्यान आता सिद्धू यांनी अचानक प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याचे पडसाद राजकीय पटलावर उमटू लागले आहेत.दरम्यान सिद्धू यांच्या राजीनाम्यावर मुख्यमंत्री चरणजीतसिंग चन्नी यांनीही प्रतिक्रिया दिली असून आपल्याला याबद्दल काही माहिती नसल्याचं म्हटलं. “सिद्धू आमचे प्रमुख आणि चांगले नेते आहेत. मी काय सांगणार जेव्हा मला काहीच माहिती नाही,” असं यावेळी ते म्हणाले. तसंच आपल्याला सिद्धू यांच्यावर पूर्ण विश्वास असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!