🕒 1 min read
मुंबई: शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंड करत आसामला तळ ठोकला होता. त्यांच्यासोबत अनेक शिवसेना नेत्यांनीही शिवसेनेशी बंड करत उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का दिला. या बंडाचा परिणाम म्हणजे आज राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले आहे. शिंदे यांचा बंड सरकार बदलणारा आणि इतिहासात कायम लक्षात ठेवला जाईल असा ठरला. या सर्व घडामोडीनंतर शिवसेनेकडून अजूनही बंडखोर आमदारांवर टीका करण्याची एकही संधी सोडली जात नाहीये. एकीकडे आमच्या मनात अजूनही उद्धव ठाकरेंबद्दल मनात आदर असल्याचे म्हणत बंडखोरी करून या आमदारांनी भाजपशी गाठ बांधली आहे. त्यामुळे राज्यात राजकीय कलह निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवरच माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी इतिहासातील काही दाखले देत शिवसेनेवर निशाणा साधला आहे.
अथवा आत्ताच्या घडीला इंग्लंडमधल्या खासदारांनी केलेला उठाव असो.
या सर्व उठावांना गद्दारी कसं म्हणता येऊ शकतं ? उठाव हे सुद्धा शस्त्र आहे आणि राजकारणातील जुनं शास्त्र आहे.
— Sadabhau Khot (@Sadabhau_khot) July 9, 2022
“लहरी राजा, दरबार अधांतरी, मग झाली दरबारातील हुजऱ्यांची माजोरी, तर राजा काय करी. अशा लहरी कारभाराविरुद्ध केलेला तो उठाव होता आणि उठावाला कधीही गद्दारी म्हटलं जात नाही. ह्याला इतिहास साक्षी आहे. मागील काळात एन. टी रामाराव ह्यांचे जावई चंद्रबाबू नायडू यांनी केलेला उठाव असो अथवा आत्ताच्या घडीला इंग्लंडमधल्या खासदारांनी केलेला उठाव असो. या सर्व उठावांना गद्दारी कसं म्हणता येऊ शकतं? उठाव हे सुद्धा शस्त्र आहे आणि राजकारणातील जुनं शास्त्र आहे.”, असे ट्वीट सदाभाऊ खोत यांनी केले आहे.
राज्यपालांच्या ‘त्या’ निर्णयाविरोधात शिवसेनेची सुप्रीम कोर्टात याचिका-
राज्यातील सत्तांतर नंतर शिवसेनेने अजून एक याचिका सुप्रीम कोर्टात दाखल केली आहे. यावेळी थेट राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या निर्णयाविरोधात शिवसेनेने याचिका केली आहे. राज्यपाल कोश्यारी यांनी एकनाथ शिंदे यांना सरकार स्थापन करण्यास दिलेल्या आमंत्रणावरून सुभाष देसाई (Subhas Desai) यांनी सदरील याचिका केली आहे.
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेने १६ आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्याची मागणी केली असून याला शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. या याचिकेवर येत्या ११ जुलैला सुनावणी होणार आहे. या सोबतच शिंदे गटाने अजय चौधरी यांच्या केलेल्या नियुक्तीला आव्हान दिले आहे. या सर्व घडामोडीत उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यामुळे महाविकास आघाडी सरकार पडले. त्यानंतर राज्यपालांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाची आणि देवेंद्र फडणवीस यांना कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ दिली. शपथ विधीच्या तीन दिवसांनी राज्यपालांनी एकनाथ शिंदे यांना बहुमत सिद्ध करण्यास सांगितले. याचवेळी विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक पार पडली. यावरूनच सुभाष देसाई यांनी याचिका दाखल केली आहे.
महत्वाच्या बातम्या:
- MNS VS Shiv Sena : “संपलेला पक्ष म्हणून हिणवलेले आदित्य ठाकरे आज पक्ष नसलेला..”, ‘मनसे’नी डिवचले
- Malaika Arora : व्हिडीओ मलायकाचा, पण नेटकऱ्यांचे लक्ष वेधले मागच्या काकांनी ; पाहा VIDEO
- Shalini Thackeray : “शिवसेनेची ‘निष्ठा यात्रा’ एक बहाना…”, शालिनी ठाकरेंची खोचक टीका
- Sanjay Raut : “…त्यांनीच शिवसेना फोडून आनंदाची विकृत ढेकर दिली”, संजय राऊतांचा टोला
- Shiv Sena : मुंबईविरोधात दिल्लीचे कारस्थान कसे उधळणार?; ‘शिवसेने’चा नवनिर्वाचित मुख्यमंत्र्यांना सवाल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
