Share

MNS VS Shiv Sena : “संपलेला पक्ष म्हणून हिणवलेले आदित्य ठाकरे आज पक्ष नसलेला..”, ‘मनसे’नी डिवचले

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेशी बंड करत शिंदे-फडणवीस सरकार स्थापन केले आहे. शिंदे यांच्या बंडानंतर अर्धी सेनाच त्यांच्या गटात शामिल झाली आहे. त्यामुळे बोटावर मोजण्याइतके नेते सध्या शिवसेनेत (Shiv Sena) उरले आहेत. तर कालपासून युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात ‘निष्ठा यात्रा’ द्वारे शक्तीप्रदर्शनास सुरुवात केली आहे. यावरूनच मनसेनी (MNS) आपल्या अधिकृत फेसबुक पेजवर आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा फोटो पोस्ट करत टीका केली आहे.

“नियतीचा खेळ! महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला “संपलेला पक्ष” म्हणून हिणवलेले आदित्य ठाकरे आज “पक्ष नसलेला” माणूस झाले आणि चिन्ह देखील गमावण्याची वेळ आल्याने महाराष्ट्राच्या राजकारणातील चेष्टेचा विषय बनले. म्हणून एखाद्याच्या वाईट काळात कधीच कुणाला हिणवू नये.”, अशी पोस्ट मनसे वृत्तांत अधिकृत या पेजवर करण्यात आली आहे. सोबत मनसेनी शिल्लकसेना हा हॅशटॅगही वापरला आहे.

दरम्यान शिवसेनेच्या अनेक आमदार नंतर आता नगरसेवकही शिंदे गटात शामिल होताना दिसून येत आहे. तर कालच शिवसेना भवनातील आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरेंनी बंडखोर आमदारांना चांगलेच सुनावले आहे. “याच भाजपच्या लोकांनी शिवसेनेवर विकृत भाषेचा वापर केला, अनेक अडचणी निर्माण केल्या तसंच विकृत भाषा वापरत टीका केली त्यांच्या मांडीला मांडी लावून बसत आहात, गाठीभेटी घेत आहात, त्यांना मिठ्या मारत आहात. मग तुमचं हे शिवसेना आणि मातोश्री विषयी प्रेम खरं आहे की तकलादू आहे?,” असा सवाल उद्धव ठाकरेंनी बंडखोर आमदारांना केला.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!