Share

मी मंत्रीपदाचा राजीनामा देतो, तुम्ही खासदारकीचा राजीनामा देणार का ?

Published On: 

🕒 1 min read

खासदार राजू शेट्टी यांनी नुकतीच सांगलीत पत्रकार परिषद घेवून शेलक्या भाषेत पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यावर टीका केली होती या टीकेला खोत यांनी देखील जोरदार प्रत्युत्तर दिल आहे तुम्हीही भाजपच्याबरोबर निवडणूक लढवली आहे. मीही भाजपबरोबरच मंत्री आहे. मी मंत्रीपदाचा राजीनामा देतो, तुम्ही खासदारकीचा राजीनामा देणार का ? असे खुले आव्हान सदाभाऊ खोत यांनी खासदार राजू शेट्टी यांना आज दिले.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून काढून टाकण्यात आल्यानंतर सदाभाऊ खोत यांनी नवी संघटना निर्मीतीच्या मसूदा समितीची घोषणा मुंबईत केली. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्याचे माजी कार्याध्यक्ष ऍड. सतीश बोरूडकर, स्वाभिमानीचे विद्यार्थी संघटनेचे माजी प्रदेश अध्यक्ष पांडूरंग शिंदे आदी उपस्थित होते.

खोत पुढे म्हणाले,  स्वाभिमानीने भाजपशी युती केली होती. त्यात लोकसभेत दोन जागा देण्यात आल्या होत्या. तर विधानसभेला काही जागा देण्यात आल्या होत्या. त्यानंतर ठरल्याप्रमाणे मला मंत्रीपद मिळाले. एका वर्षातील कालावधीमध्ये राज्यातील शेतकऱ्यांना डोळ्यासमोर ठेवून सरकारमध्ये काम केले. मार्केट कमिटीचा कायद्यामध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला. भाजीपाला नियमन मुक्त करण्यात आले. राज्यातील शेतकऱ्यांना ठिबकचे थकित अनुदान मिळवून दिले. तूर खरेदी केंद्रावर जात तूर खरेदी करण्यात आली. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना फायदा झाला.’ मी मंत्रीपदाचा राजीनामा देतो, तुम्ही खासदारकीचा राजीनामा देणार का ? असे खुले आव्हान सदाभाऊ खोत यांनी खासदार राजू शेट्टी यांना दिलंआहे त्यामुळे आता राजू शेट्टी स्वाभिमानी बाणा दाखवत खरंच राजीनामा देणार की भाजपसोबत निवडणूक लढवून मिळवलेली खासदारकी सोडणार हे पाहण महत्वाच ठरणार आहे .

 

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!