Share

सचिन वाझेची तब्येत पुन्हा बिघडल्याने रुग्णालयात नेण्याची वेळ

Published On: 

मुंबई –  उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळील वाहनात जिलेटिनच्या कांड्या आढळल्याच्या संदर्भात अटक केलेले निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे 3 एप्रिलपर्यंत एनआयएच्या ताब्यात असणार आहेत. यापूर्वी सचिन वाझे यांना 25 मार्चपर्यंत एनआयए कोठडी सुनावण्यात आली होती. जी 3 एप्रिलपर्यंत वाढवण्यात आली आहे. एनआयएने 13 मार्चला सचिन वाझे यांना अटक केली आहे.

दरम्यान,सचिन वाझे यांची तब्येत पुन्हा बिघडल्याची माहिती समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, रविवारी रात्री सचिन वाझे यांच्या छातीत अचानक दुखायला लागले. त्यामुळे रात्री साडेदहाच्या सुमारास NIAच्या अधिकाऱ्यांनी वाझे यांना मुंबईच्या जे.जे. रुग्णालयात नेले होते.

याठिकाणी त्यांच्यावर उपचार करण्यात आले. त्यानंतर रात्री 1.30च्या सुमारास सचिन वाझे यांना परत आणण्यात आले. यापूर्वीही चौकशीदरम्यान दोन-तीन वेळा सचिन वाझे यांची प्रकृती बिघडली होती. तेव्हादेखील एनआयएच्या अधिकाऱ्यांनी त्यांना रुग्णालयात नेले होते. याठिकाणी त्यांच्या चाचण्या करण्यात आल्या होत्या. तेव्हा सचिन वाझे यांना मधुमेहाचा त्रास असल्याचे निष्पन्न झाले होते.एका वृत्तवाहिनीने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

दरम्यान,अँटिलीया प्रकरणात चौकशीसाठी एनआयए रविवारी सचिन वाझे यांच्यासमवेत मिठी नदीवर गेली होती. एनआयएला नदीतून नंबर प्लेट आणि डीव्हीआय यासह अनेक पुरावे सापडले आहेत. डीव्हीआर नष्ट करुन तो नदीत फेकला गेल्याचा संशय आहे. नदीतून दोन सीपीयू आणि एक हार्ड डिस्क डायव्हर्स सापडले आहेत. दोन नंबर प्लेट्स सापडल्या असून दोन्हींवर एकच नंबर लिहिलेला आहेत यामुळे देखील वाझे यांच्या अडचणी वाढणार आहेत अशी शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!