Share

सचिन तेंडुलकरने केला असा प्रँक की डॉक्टरही घाबरले

Published On: 

मुंबई : भारतीय क्रिकेटचा महान फंलदाज सचिन तेंडुलकर हा सध्या रायपुर येथे रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिज स्पर्धेत खेळत आहे. या स्पर्धेत सचिन तेंडूलकर हा भारतीय लिंजड संघाचे नेतृत्व करत आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभुमीवर खबरदारी म्हणून या स्पर्धेत खेळणाऱ्या सर्व संघाच्या खेळाडूंची प्रत्येक सामन्यापुर्वी कोरोना चाचणी करण्यात येत आहे.

या स्पर्धेत भारताचा दुसरा सामना हा इंग्लड संघाविरुद्ध होता. या सामन्यापुर्वी खेळाडूंची कोरोना चाचणी करत असताना भारतीय संघाचा कर्णधार सचिन तेंडुलकर याने कोरोना चाचणी करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यासोबत प्रँक करत शिंक येत आहे असा हावभाव केला. या प्रँकमुळे वैद्यकीय अधिकारी काही काळासाठी घाबरले होते. पण सचिन हसु लागताच त्यांना लक्षात आले की हा प्रँक होता.

https://www.instagram.com/p/CML-7JhAX4l/

या प्रँकचा व्हिडीओ सचिननं इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. या पोस्टमध्ये सचिन तेंडुलकरने लिहिले आहे की, मी २०० कसोटी सामने खेळलो आणि ही माझी २७७ वी कोव्हिड चाचणी आहे, वातावरण हलकं करण्यासाठी एक छोटा प्रँक नक्कीच बनतो. येथील आमच्या वैद्यकिय कर्मचाऱ्यांना माझा सलाम.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!