🕒 1 min read
मुंबई : भारताचा दिग्गज क्रिकेटपटू आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने दिवंगत शेन वॉर्नला “कठीण प्रतिस्पर्धी” म्हणत श्रद्धांजली वाहिली आहे. शेन वॉर्न माईंड गेम खेळण्यात तरबेज असल्यामुळे त्याच्याविरुद्ध खेळण्यासाठी नेहमीच वेगळ्या पद्धतीने तयारी करावी लागत होती, असे सचिनने म्हटले.
सचिन म्हणाला, “शेन वॉर्नविरुद्धची माझी पहिली खरी मालिका १९९८ मध्ये भारतात होती. सर्वांनी त्या मालिकेला तेंडुलकर विरुद्ध शेन वॉर्न असे म्हटले होते. अशा गोष्टींमुळे तुमच्यावर दबाव येतो. जेव्हा तुम्ही त्याच्यासारख्या जागतिक दर्जाच्या गोलंदाजाचा सामना करत असाल, तेव्हा तुम्ही गोष्टी गृहीत धरू शकत नाही. तुम्हाला त्याच्यापेक्षा एक पाऊल पुढे असायला हवे. तो काय विचार करत असेल हे तुम्हाला माहीत असले पाहिजे, कारण तो दबाव निर्माण करण्यात खूप चांगला होता आणि तो मानसिक खेळ खेळायचा आणि तुम्हाला आऊट करण्यासाठी रणनीती बनवायचा.”
१९९८ची मालिका आठवताना सचिन म्हणाला, “वॉर्नच्या देहबोलीवरून त्याला काही फरक पडत नव्हता असे वाटायचे. त्याने चार विकेट घेतल्या, पाच विकेट घेतल्या की एकही विकेट घेतली नव्हती हे त्याच्या देहबोलीबद्दल कोणालाच कळायचे नाही. तो एक तगडा प्रतिस्पर्धी होता आणि त्याने खेळलेल्या प्रत्येक चेंडूवर ते दिसून आले. अनेक चांगले फिरकीपटू होते, पण शेन त्यांच्यापेक्षा हटके होता. तो अशा मोजक्या गोलंदाजांपैकी एक होता ज्याच्याविरुद्ध तुम्ही उसळी घेतलेल्या चेंडूवर फटका खेळू शकत नव्हता.”
क्रिकेटमधील सर्वकालीन महान खेळाडूंपैकी एक असलेल्या वॉर्नचे वयाच्या ५२व्या वर्षी ४ मार्च रोजी थायलंडमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
महत्त्वाच्या बातम्या –
- “डायरीचा डायरिया झाला आहे यांना…” – वरुण सरदेसाई
- IPL 2022 : “तेवतिया एक क्रांती आहे…”, वीरेंद्र सेहवागचं व्हायरल होतंय ‘ते’ ट्वीट!
- हिंदू सणांना परवानगी देण्याचा विषय आला की ठाकरे सरकारच्या हाताला लकवा का मारतो?- आशिष शेलार
- आलिया-रणबीरचा साधा विवाहसोहळा; फोटो होतोय व्हायरल
- सदाभाऊंच्या ‘त्या’ वक्तव्यावर अमोल मिटकरींचा पलटवार; म्हणाले, “शरद पवारांवर बोलताना सुर्यासमोर…”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
