मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा माजी स्फोटक सलामीवीर वीरेंद्र सेहवागने आयपीएल फ्रेंचायझी गुजरात टायटन्सचा अष्टपैलू खेळाडू राहुल तेवतियाचे कौतुक केले आहे. तेवतियाने लखनऊ सुपर जायंट्सविरुद्धच्य सामन्यात दमदार फलंदाजी केली. त्याने २४ चेंडूत नाबाद ४० धावा तडकावल्या. या सामन्यात गुजरात टायटन्सने लखनऊचा ५ गडी राखून पराभव केला.
केएल राहुलच्या नेतृत्वाखाली लखनऊने प्रथम फलंदाजी करताना ५ बाद १५८ धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्स संघाने २ चेंडू शिल्लक असताना हा सामना जिंकला.
‘मुलतानचा सुलतान’ अर्थात सेहवागने त्याच्या ट्विटर हँडलवर म्हटले, ‘तेवतिया एक क्रांती आहे, समोरच्या संघात अशांतता आहे. लॉर्ड तेवतिया की जय हो.’ सेहवाग इथेच थांबला नाही, तर त्याने गुजरात टायटन्सच्या विजयाचे वर्णन करून युवा फलंदाज आयुष बदोनी आणि अभिनव मनोहर यांच्या कौशल्याची प्रशंसा केली. राहुल तेवतिया, डेव्हिड मिलर आणि अभिनव मनोहर यांच्या जोरावर गुजरातने लखनऊ सुपर जायंट्सच्या जबड्यातून विजय हिसकावून घेतला.
महत्त्वाच्या बातम्या –
- “मुख्यमंत्र्यांना काही अधिकार आणि इज्जत आहे की नाही अशोकराव?”, भातखळकरांचा सवाल
- IPL 2022 : “मला रिटेन करण्याबाबत RCBनं…”, राजस्थान संघात गेल्यानंतर चहलचा धक्कादायक खुलासा!
- “…मग निर्णय झाला नाही असे का म्हणता?”, अशोक चव्हाणांच्या वक्तव्यावर केशव उपाध्येंची प्रतिक्रिया
- IPL 2022 : आज सनरायर्झसमोर रॉयल्सचं आव्हान; रेकॉर्ड पाहिला तर ‘हा’ संघ ठरणार विजेता!
- “देशातील लोकशाही धोक्यात आहे, भाजपविरोधात एकत्र या”- ममता बनर्जींचे मुख्यमंत्र्यांना पत्रं
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

