मुंबई: सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली क्रिकेट विश्वातील दोन मोठे नाव आहेत. सुदैवाने ते दोघेही भारतीय क्रिकेट संघाचे भाग राहिले आहेत. भारताच्या सगळ्या क्रिकेटप्रेमींसारखेच विराट (virat kohli) लहानपणापासून सचिनला त्याचे आयडल मानतो. विराटला सचिन सोबत खेळायची संधी मिळाली आहे. एवढेच नव्हे तर सचिन सोबत त्याने विश्वचषकही जिंकले आहे. सचिनने नुकतेच विराट सोबतच्या एका भावनिक क्षणाबद्दल खुलासा केला आहे.
सचिनने त्याच्या शेवटच्या सामन्यात झालेल्या या हृदयस्पर्शी घटनेबद्दल खुलासा केला आहे. तो म्हणाला “मी डोक्यावर टॉवेल घेऊन एका कोपऱ्यात बसलो होतो, मी खूप भावूक झालो होतो आणि त्यावेळी विराट माझ्याकडे आला होता आणि विराटने मला त्याच्या वडिलांनी दिलेला पवित्र धागा दिला. म्हणून, मी ते काही काळ जपून ठेवले, आणि नंतर ते त्याला परत केले आणि म्हणालो, ‘हे अमूल्य आहे आणि हे तुझ्याकडेच असले पाहिजे आणि इतर कोणाकडेही नाही. हे तुझे आहे आणि शेवटच्या श्वासापर्यंत ती तुझ्याकडे असली पाहिजे. ,” सचिनला (sachin tendulkar) ती अमूल्य भेट बघून अश्रू राहवले नसल्याचे त्याने सांगितले.
याबाबत विराटनेही एका मुलाखतीत सांगितले होते “आम्ही सहसा आपल्या मनगटावर धागे बांधतो, भारतात बरेच लोक करतात. म्हणून, माझ्या वडिलांनी मला एक धागा दिला होता. तो मी माझ्या पिशवीत माझ्याजवळ ठेवत असे आणि मग मला वाटले हि माझ्याकडे असलेली सर्वात मौल्यवान गोष्ट आहे. मी सचिनला सांगितले , मी यापेक्षा अधिक मौल्यवान काहीही देऊ शकत नाही आणि मला फक्त तुम्हाला सांगायचे आहे की तुम्ही मला किती प्रेरित केले आहे आणि तुमचा आम्हा सर्वांसाठी काय अर्थ आहे आणि ही माझी तुम्हाला छोटी भेट आहे.”
महत्वाच्या बातम्या
- राज्यातील जनतेला वास्तव कळावे म्हणून किरीट सोमय्या आज कोर्लई गावात जाणार
- ‘देवेंद्रजी ३०-३५ पुरणपोळ्या पातेलंभर तुपासोबत खायचे’, अमृता फडणवीसांचा अजब खुलासा
- रणजी ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यात कर्णधार मनीष पांडेचे शतक
- अर्जुनचे सामने पाहायला मी कधीच जात नाही ; कारण…
- टीका करून जे गाजावाजा करतात … ; उदय सामंत यांचा राणेंना टोला


