🕒 1 min read
रायपूर : भारतात सध्या इंडिया रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिज टी 20 स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेत 5 मार्चला बांगलादेश लिजेंड्स विरुद्ध इंडिया लिजेंड्स India Legends यांच्यात सामना खेळवण्यात आला. या सामन्यात इंडियाने बांगलादेशवर 10 विकेट्सने शानदार विजय मिळवला.
आंतरराष्ट्रीय आणि आयपीएलमधून निवृत्ती घेतल्यानंतरच्या अनेक वर्षांनतरही वीरेंद्र सेहवागचा जलवा कायम आहे. सेहवागने आपल्या दमदार अर्धशतकाच्या जोरावर आपल्या संघाला शानदार विजय मिळवून दिला. या सामन्यात सेहवागने विजयी खेळी साकारली. सेहवागने एकूण 35 चेंडूत 80 धावांची नाबाद खेळी केली.
विजयी आव्हानाचं पाठलाग करायला सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवाग मोठी आणि अनुभवी जोडी मैदानात आली. वीरेंद्र सेहवागने आपल्या नेहमीच्या आक्रमक शैलीत खेळीला सुरुवात केली. सेहवागने बांगलादेशच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. सेहवागने गोलंदाजांवर जोरदार हल्लाबोल केला.
https://twitter.com/urmilpatel30/status/1367871633654956032?s=20
सेहवागने अवघ्या 20 चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. विशेष म्हणजे त्याने सिक्स खेचत हे अर्धशतक झळकावलं. तर सोबत असलेल्या सचिनने सेहवागला चांगली साथ दिली. सचिनने सेहवागला स्ट्राईकवर खेळण्याची संधी दिली.
सेहवागने 80 धावांच्या खेळीसह स्वत:चा रेकॉर्ड मोडला. सेहवागने गेल्या वर्षी या स्पर्धेत विंडिज विरुद्ध 74 धावांची खेळी केली होती. ही सेहवागची सर्वोच्च धावसंख्या होती. इंडियाचा या विजयासह हा तिसरा विजय ठरला आहे.
इंडिया लेजेंड्सचा संघ
सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग, युवराज सिंग, मोहम्मद कैफ, युसुफ पठाण, नमन ओझा, झहीर खान, प्रज्ञान ओझा, नोएल डेव्हिड, मुनाफ पटेल, इरफान पठाण आणि मनप्रीत गोनी.
महत्वाच्या बातम्या
- पालकमंत्री देसाई दोन दिवसात घेणार शहरातील पाणीटंचाई निवारणासाठी बैठक
- मराठवाड्यात ऑक्सिजन टँक वाढवण्याच्या विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकरांच्या सूचना
- आखेर ‘त्या’ महिलांच्या आभूतपुर्व लढ्याला यश; दारुबंदीचा ठराव मंजूर
- टीसीच्या नोकरीचे आमिष दाखवून २३ वर्षीय तरुणाचा तिघांना १६ लाखांचा गंडा
- औरंगाबादकरांनो काळजी घ्या! २४ तासांत ४५९ नव्या रुग्णांची नोंद; पाच जणांचा मृत्यू
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
