🕒 1 min read
मुंबई : अन्वय नाईक प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असणारे रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामीला सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा देण्यात आला आहे. अर्णब गोस्वामीसह इतर दोन जणांना जामीन देण्यात आला आहे. अर्णबच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली असता ‘तात्काळ सुनावणी’साठी सूचीबद्ध करून अर्णबच्या जामीनावर काल लगेचच सुनावणी करण्यात आली.
सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारत उच्च न्यायालयाच्या निकालावर देखील नाराजी व्यक्त केली व अर्णबला अंतरिम जामीन मंजूर केला. जामीन मिळाल्यानंतर पुन्हा एकदा न्यूज रुममध्ये दाखल झालेल्या अर्णब गोस्वामी यांनी ‘खोट्या’ प्रकरणात त्यांना अटक केल्याचं सांगत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर बुधवारी हल्लाबोल केला.
अर्णबने महाराष्ट्र सरकारसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका करत खुलं आव्हान दिल्यानंतर काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी अर्णबला प्रत्युत्तर दिलं आहे. अर्नबच्या रिपब्लिक टीव्हीवर पैसे देऊन टीआरपी घोटाळा केल्याचा आरोप आहे. ५००-१००० देऊन काही ठराविक लोकांना केवळ आपलेच चॅनेल पाहायला लावून टीआरपी वाढीसाठी घोटाळा केल्याचा गंभीर आरोप अर्णबच्या चॅनेलवर आहे.
त्यामुळे, अर्णबच्या सुटकेनंतर तळोजा कारागृहाबाहेर झालेली गर्दी ही ५००-१००० रुपये देऊन जमवलेली असल्याची टीका करत टीआरपी घोटाळा करणाऱ्याबद्दल आणखी काय बोलावं असा टोला लगावत अर्नबच्या आव्हानावरच घणाघात केला आहे.
अर्णबचं महाराष्ट्र सरकारला आव्हान!
‘उद्धव ठाकरे, ऐका माझं. तुमचा पराभव झालाय. उद्धव ठाकरे तुम्ही मला एका जुन्या, खोट्या प्रकरणात अटक केली. आणि माझी माफीही मागितली नाही. खेळ आता सुरु झाला आहे. मी तुरूंगाच्या आतूनही वाहिनी सुरू करेन आणि तुम्ही काहीही करू शकणार नाही,’ असं आव्हान त्याने महाराष्ट्र सरकार व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलं आहे. तर, आता प्रत्येक भाषेत रिपब्लिक टीव्ही सुरू करणार असल्याची घोषणाही त्याने केली.
महत्वाच्या बातम्या
- सर्वोच्च न्यायालयाने अशीच तत्परता मराठा आरक्षणप्रश्नी दाखवावी – सचिन सावंत
- जेलमधून बाहेर पडताच अर्नबची दुसऱ्या जामिनासाठी पळापळ !
- ‘देशात पहिल्यांदा मंदी आली, मोदींनी देशाची शक्ती कमकुवत केली’
- आमदारांनी पक्ष सोडू नये म्हणूनच फडणवीस ‘हे सरकार पडणार’ असं सांगतात – जयंत पाटील
- ‘मी नाराज असल्याच्या चर्चा व्यर्थ, पण…’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

