Share

‘देशात पहिल्यांदा मंदी आली, मोदींनी देशाची शक्ती कमकुवत केली’

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : बिहार निवडणुकीच्या पराभवाच्या धक्क्यातून सावरत खासदार राहुल गांधी यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. भारतात पहिल्यांदाच आर्थिक मंदी आली असल्याचे राहुल गांधी यांनी गुरुवारी ट्विट करत म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची शक्ती कमकुवत केली आहे, असे टीकास्त्रही राहुल गांधी यांनी सोडले आहे.

राहुल गांधी यांनी यासंदर्भात भारतीय रिझर्व्ह बँकेकडून प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीचाही दाखला दिला आहे. जुलै ते डिसेंबर या तिमाहीत देशाचे सकल राष्ट्रीय उत्पादन अर्थात जीडीपी आहा ८.६ टक्के राहिल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर राहुल गांधींनी मोदी सरकारला धारेवर धरलं आहे.

रिझर्व्ह बँकेकडून काही दिवसांपूर्वी बुधवारी यासंदर्भातील माहिती प्रसिद्ध करण्यात आली होती. यामध्ये जुलै-डिसेंबर या तिमाहीत भारताचा विकासदर 8.6 टक्क्यांपेक्षा खाली राहील, असा अंदाज वर्तविण्यात आला होता. कोरोना संकटामुळे चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या दोन तिमाहीत उणे विकासदर नोंदवला गेला होता. त्यामुळे देश मंदीच्या फेऱ्यात अडकल्याची भीती जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!