🕒 1 min read
मुंबई : अन्वय नाईक प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असणारे रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामीला सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा देण्यात आला आहे. अर्णब गोस्वामीसह इतर दोन जणांना जामीन देण्यात आला आहे. जामीन मिळाल्यानंतर पुन्हा एकदा न्यूज रुममध्ये दाखल झालेल्या अर्णब गोस्वामी यांनी ‘खोट्या’ प्रकरणात त्यांना अटक केल्याचं सांगत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर बुधवारी हल्लाबोल केला.
मात्र, तुरुंगातून सुटल्यानंतरही, अर्णबची समस्या पूर्णपणे संपलेली नाही. कारण त्यांच्यावर आधीपासूनच पोलिसांना मारहाण केल्याचा आरोप आहे. अर्णब गोस्वामी आणि सम्यब्रता रे गोस्वामी यांनी महिला पोलिस कर्मचाऱ्याला धक्काबुक्की केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरवर बुधवारी सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन दाखल केला आहे.
सुप्रीम कोर्टाने गोस्वामींना २०१८ मध्ये इंटिरियर डिझायनर अन्वय नाईक आणि त्यांच्या आईच्या आत्महत्येला कारणीभूत असल्याच्या आरोपाखाली अंतरिम जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणात ४ नोव्हेंबरला अटक झाल्यापासून नवी मुंबईतील तळोजा तुरूंगात कैद असलेल्या गोस्वामींची तुरूंगातून सुटका करण्यात आली आहे. ४ नोव्हेंबरला जेव्हा पोलिसांची टीम त्यांन उचलण्यासाठी निवासस्थानी पोहोचली तेव्हा त्यांनी एका महिला पोलिस कर्मचाऱ्याला मारहाण केली. या संदर्भात मध्य मुंबईमधील एम. जोशी मार्ग पोलिस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल करण्यात आला होता.
महत्वाच्या बातम्या
- टीम इंडियाच्या कर्णधार पदाची धुरा रोहितकडे सोपवा; दिग्गज खेळाडूंनी केली मागणी
- चिंताजनक : दिल्लीत कोरोनाचा प्रकोप, मागील चोवीस तासात आढळले रेकोर्डब्रेक रुग्ण
- “महात्मा गांधींचा फोटो हरीश साळवेंच्या फोटोशी बदलण्याची हीच ती वेळ”-कुणाल कामरा
- ‘गेल्या वर्षीच्या ऑक्टोबरच्या तुलनेत जीएसटी परताव्यात झाली १० टक्क्यांची वाढ’ – अर्थमंत्री निर्मला सीतारामन
- शेतकऱ्यांची दिवाळी अंधारातच, भाजपा करणार चुन भाकर आंदोलन


