मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करणारे भाजप खासदार बृजभूषण सिंह यांच्या पक्षनिष्ठेवर भाजपकडूनच प्रश्न उपस्थित करण्यात आल्याचे दिसून येते आहे. राज्यातील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी याबाबत शंका उपस्थित केली आहे. तर यावरूनच काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत (sachin sawant) यांनी भाजपला सवाल केला आहे.
“आपली कातडी वाचवण्यासाठी भाजपा खा. बृजभूषण सिंह यांच्या निष्ठेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे. विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांशी कनेक्शनमुळे ते विरोध करत नाहीत ना? अशी शंका व्यक्त केली. जर असे असेल तर बृजभूषण यांना पक्षातून निलंबित करावे. पक्षनिष्ठा नसलेल्या व्यक्तीला भाजपात ठेवणे कितपत योग्य आहे?”, असा सवाल सचिन सावंत यांनी केला आहे.
पक्षनिष्ठा नसलेल्या व्यक्तीला भाजपात ठेवणे कितपत योग्य आहे? आपल्या खासदारावरच शंका घेणे ही गंभीर बाब आहे. भाजपाचा उत्तर भारतीयांसाठी कळवळा ही खोटा दिसतो.
"अयोध्या द ट्रॅप" या चित्रपटाचे कथानक भाजपानेच रचले व @BJP4Maharashtra नेच रसद पुरवली या मताशी आम्ही ठाम आहोत
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) May 23, 2022
तसेच आपल्या खासदारावरच शंका घेणे ही गंभीर बाब आहे. भाजपाचा उत्तर भारतीयांसाठी कळवळा ही खोटा दिसतो. “अयोध्या द ट्रॅप” या चित्रपटाचे कथानक भाजपानेच रचले व भाजपनेच रसद पुरवली या मताशी आम्ही ठाम आहोत. असेही सचिन सावंत यांनी म्हटले आहे. दरम्यान काल (२२ मे) पुण्यातील भाषणात राज ठाकरे यांनी अयोध्या दौरा यामागे सापळा असून त्यासाठी महाराष्ट्रातून रसद पुरवल्याचा आरोप केला होता.
महत्वाच्या बातम्या:
- IPL 2022 SRH vs PBKS : पंजाबचा हैदराबादवर सोपा विजय; लिव्हिंगस्टोनची वादळी खेळी!
- IPL 2022 SRH vs PBKS : हरप्रीतनं हैदराबादला रोखलं..! पंजाबसमोर शेवट ‘गोड’ करण्यासाठी १५८ धावांचं लक्ष्य
- IPL 2022 : ओ तेरी..! आमिर खान CSKसाठी खेळणार? म्हणाला, “मी जर चांगला खेळलो, तर…”
- IND vs ENG 2022 : इंग्लंडविरुध्दच्या पुनर्नियोजित एका कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा; वाचा!
- उर्फी जावेद आणि राखी सावंतचा हॉट लुक, चाहते घायाळ; पहा व्हिडीओ…


