Share

IPL 2022 SRH vs PBKS : हरप्रीतनं हैदराबादला रोखलं..! पंजाबसमोर शेवट ‘गोड’ करण्यासाठी १५८ धावांचं लक्ष्य

Published On: 

मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022) मधील लीग टप्प्यातील शेवटचा सामना आज सनरायझर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्ज (SRH vs PBKS) यांच्यात खेळवला जात आहे. वानखेडे स्टेडियमवर रंगणाऱ्या या साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यात हैदराबादने पंजाबला १५८ धावांचे आव्हान दिले आहे. केन विल्यमसन घरी परतल्यामुळे भुवनेश्वर कुमारकडे हैदराबाद संघाची धुरा आहे. त्याने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. दोन्ही संघ आधीच बाद झाल्याने या सामन्याला प्लेऑफच्या दृष्टिकोनातून महत्त्व नाही.

हैदराबादचा डाव

पंजाबचा वेगवान गोलंदाज कगिसो रबाडाने सलामीवीर प्रियम गर्गला (४) स्वस्तात बाद करत हैदराबादला पहिला धक्का दिला. त्यानंतर अभिषेक शर्मा आणि राहुल त्रिपाठी यांनी अर्धशतकी भागीदारी रचली. हरप्रीत ब्रारने अभिषेकला बाद करत ही भागीदारी मोडली. लियाम लिव्हिंगस्टोनने अभिषेकचा सीमारेषेवर अप्रतिम झेल घेतला. अभिषेकने ५ चौकार आणि २ षटकारांसह ४३ धावा केल्या. ब्रारने त्रिपाठी (२०) आणि एडन मार्कराम (२१) यांना बाद करत हैदराबादला संकटात टाकले. वॉशिंग्टन सुंदर आणि रोमारियो शेफर्ड यांनी फटकेबाजी करत हैदराबादला दीडशेपार पोहोचवले. शेवटच्या षटकात सुंदर बाद झाला. त्याने ३ चौकार आणि एका षटकारासह २५ धावा केल्या. शेफर्ड २ चौकार आणि २ षटकारांसह २६ धावांवर नाबाद राहिला. २० षटकात हैदराबादने ८ बाद १५७ धावा केल्या. पंजाबकडून ब्रार आणि नॅथन एलिस यांनी प्रत्येकी ३ बळी घेतले.

दोन्ही संघांची Playing 11

सनरायझर्स हैदराबाद – अभिषेक शर्मा, प्रियम गर्ग, राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम, निकोलस पूरन (यष्टीरक्षक), रोमारियो शेफर्ड, वॉशिंग्टन सुंदर, जगदीश सुचित, भुवनेश्वर कुमार (कप्तान), फजलहक फारुकी, उमरान मलिक.

पंजाब किंग्ज – जॉनी बेअरस्टो, शिखर धवन, लियाम लिव्हिंगस्टोन, मयंक अग्रवाल (कप्तान), शाहरुख खान, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), हरप्रीत ब्रार, नॅथन एलिस, प्रेरक मंकड, कगिसो रबाडा, अर्शदीप सिंग.

महत्त्वाच्या बातम्या –

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!