Share

IPL 2022 : ओ तेरी..! आमिर खान CSKसाठी खेळणार? म्हणाला, “मी जर चांगला खेळलो, तर…”

Published On: 

मुंबई : बॉलिवूडचा दिग्गज अभिनेता आमिर खानने अलीकडेच आयपीएळ २०२२ (IPL 2022) मधील चेन्नई सुपर किंग्ज (CSK) संघासाठी एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये, त्याने चार वेळा आयपीएल विजेता कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली खेळण्याची इच्छा व्यक्त केली. चेन्नई सुपर किंग्जच्या फॅन पेजने हा व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये आमिर खान फ्रेंचायझीवरील त्याच्या प्रेमाविषयी बोलत आहे.

आमिर म्हणाला, ”व्हिसल पोडू आर्मी आणि CSKच्या सर्व चाहत्यांसाठी माझे सर्व प्रेम. तुमचे खूप आभार, तुम्हाला वाटले की मी तुमच्या टीममध्ये असू शकतो आणि हा एक मोठा सन्मान आहे. मी खूप कृतज्ञ आहे. तुमच्या प्रेमाबद्दल धन्यवाद. पिवळ्या रंगात खेळणे माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट असेल. माहीच्या नेतृत्वाखाली खेळणे माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट असेल. मी त्याचा खूप मोठा चाहता आहे आणि जेव्हा मी त्याला पहिल्यांदा पाहिले तेव्हा मला वाटले की येथे एक व्यक्ती आहे जी बाहेरून शांत आहे, परंतु त्याच्या एक वादळ घोंगावते आहे, जे आपण पाहू शकत नाही. धोनी पुढच्या हंगामात खेळणार आहे आणि ही चांगली बातमी आहे. तुम्ही सर्व मला नेट्समध्ये पाहू शकता आणि जर मी चांगला खेळलो, तर मला आशा आहे की तुम्ही सर्वजण माझ्यासाठी खरोखर शिट्ट्या वाजवाल.”

https://www.instagram.com/p/Cd2QF74oO95/

गेल्या मोसमातील चॅम्पियन सीएसकेला या हंगामातही मोठ्या आशा होत्या पण संघाने निराशा केली. चेन्नई प्लेऑफमध्येही पोहोचू शकला नाही आणि या मोसमात त्यांना 14 पैकी फक्त चार सामने जिंकता आले. यातील दोन विजय रवींद्र जडेजाच्या नेतृत्वाखाली मिळाले. इतर दोन विजय धोनीच्या नेतृत्वाखाली मिळाले. धोनीने आठ सामन्यांनंतर संघाची धुरा सांभाळली.

महत्त्वाच्या बातम्या –

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!