🕒 1 min read
मुंबई : शिवसेनेने ते सचिन अहिर यांनी मातोश्रीवर झालेल्या बैठकीनंतर रात्री उशिरा बैठकीत झालेल्या चर्चेबद्दल माहिती दिली. सुप्रीम कोर्टात तारखा पुढे ढकलत आहेत, यावर चर्चा झाली असून महाराष्ट्रात जी अतिवृष्टी झालेली आहे त्यावर देखील चर्चा झाली असल्याचं अहिर यांनी सांगितलं आहे. तसेच मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकी बाबत संदर्भात चर्चा झाली आणि अतिवृष्टी शेतकऱ्यांना मदत कशी मिळेल यावर देखील चर्चा करण्यात आली असल्याचं अहिर म्हणाले. उद्धव ठाकरे यांना कधीही सत्तेचा अभ्यास नव्हता असं म्हणत शेतकऱ्यांकरता कष्ट करणाऱ्यांकरीता हे सरकार काय निर्णय घेत आहे?, असा सवाल अहिर यांनी केला.
22 वर्षांच्या गोविंदाचा मृत्यूः
सातव्या थरावरून कोसळलेल्या बावीस वर्षाच्या गोविंदाचा मृत्यू झाल्याबाबत बोलत असताना शिवशंभू गोविंदा पथकाचा संदेश प्रकाश दळवी हा विलेपार्ले मध्ये जखमी झाला होता. मात्र सोमवारी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला असल्याचं अहिरांनी सांगितलं. एवढंच नाही तर यावरून त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. गोविंदाचा मृत्यू झाला आहे, जांभोरी मैदानामध्ये ज्यांनी नियोजन केलं त्यांनी खाली गाद्या ठेवल्या नव्हत्या, रुग्णवाहिकेची देखील व्यवस्था नव्हती, मंडळाच्या लोकांनी त्याला ऍडमिट केलं, मात्र, दुर्दैवाने या जखमी गोविंदाकडे बिल मागितलं जात होतं. तसेच लहान मुलांना दहीहंडी फोडण्यासाठी घेता येत नाही, तरीही गोविंदांमध्ये अनेक लहान मुलांचा समावेश होता, थरांची उंची देखील मर्यादित ठेवली पाहिजे, मात्र ती देखील पाळलं नाही, उंचीला स्पर्धा करू नका, उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री यांच्या पक्षातला कोणीही या गोविंदाला जाऊन भेटून आला नाही, असा आरोप सचिन अहिर यांनी केला.
सचिन अहिर यांनी दिली माहितीः
दरम्यान, विधिमंडळात काय झालं याबद्दल आमदारांशी चर्चा केली असून त्याचा आढावा घेण्यात आला असल्याचं सचिन अहिर यांनी सांगितल आहे. तसेच ओला दुष्काळ जाहीर व्हायला पाहिजे होता, मात्र शासन म्हणून हे का मान्य होत नाही याबाबत उद्धव ठाकरे यांनी आढावा घेतला असून पक्ष संघटनेबाबतही आढावा घेण्यात आला असल्याचं अहिर यांनी सांगितलं.
महत्वाच्या बातम्याः
- Shivsena | जे वाजपेयी आणि आडवाणी या मायबापांना विसरले ते बाळासाहेबांचे स्वप्न कसले साकारणार?, शिवसेनेचा भाजपाला सवाल
- Rana Couple | हनुमान चालिसाप्रकरणी राणा दाम्पत्य यांना दिलासा, जामीन रद्द करण्याची मागणी फेटाळली
- Shivsena । बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करणार, या तुमच्या ढोंगावर आणि सोंगावर जनता थुंकते! शिवसेनेचा फडणवीसांवर हल्लाबोल
- Shivsena । घोडा मैदान लांब नाही, तोपर्यंत शिंदे गटाकडून तेल मालीश करून घ्या; शिवसेनेचा भाजपाला टोला
- Ambadas Danve | वॉर्ड रचना बदलावर अंबादास दानवेंची प्रतिक्रीया


