मुंबई : राज्यातील आरोग्य विभागाची परीक्षा ऐनवेळी रद्द झाल्याने राज्यातील विद्यार्थ्यांनी राज्य सरकारवर संताप व्यक्त कैला जात आहे. त्याचबरोबर विरोधकांनीही महविकास आघाडीवर या मुद्द्यावरुन जोरदार ताशेरे ओढले. मात्र आता या सेवा भरतीमध्ये मोठा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप ओबीसीचे नेते प्रकाश शेंडगे यांनी केला आहे. याबाबतची धक्कादायक ऑडिओ क्लीप सध्या व्हायरल होत आहे.शेंडगेंच्या आरोपात तथ्य असल्याचं मत विधान परिषेदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी म्हंटल आहे.
प्रकाश शेंडगे यांच्या आरोपात 100 टक्के तथ्य आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दलाल घुसल्यामुळेच आरोग्य विभागाची परीक्षा रद्द झाल्याचा संशय व्यक्त केला होता. मीही परीक्षा ऐनवेळी रद्द झाल्याने राज्य सरकारवर महाघोटाळा झाला असल्याचा जाहीर आरोप केला होता. न्यासा कंपनी नॉट क्वालिफाईड असं लिहिण्यात आलं होतं त्याचा आदेश माझ्याकडं आहे. या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी प्रविण दरेकरांनी केली आहे.
8 वेळा त्याच कंपनीला क्वालिफाईड करण्याचं महापुण्याचं काम या सरकारने केले आहे. यामध्ये स्पष्ट आहे की त्यांना यामध्ये गैरव्यवहार करणं, घोटाळे करणं, विद्यार्थ्यांकडून पैसे गोळा करणं, दलाल बाजारात फिरत होते. हे एक उदाहरण आपल्यासमोर आलं आहे, अशी अनेक उदाहरणं समोर येतील, असंही प्रविण दरेकर म्हणाले आहेत.
विद्यार्थ्यांकडे 5, 10 ते 15 लाख रुपयांची मागणी करुन, भरती करण्याचं आश्वासन दिलं जात आहे. त्यामुळे परीक्षा रद्द का झाली याची तर चौकशी व्हायलाच हवी, पण या दलालांचाही शोध घेऊन आवश्यक ती कारवाई करावी, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. आता ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानं शंका वाढल्याचं बोललं जातंय.
राज्यातील आरोग्य सेवा भरतीमध्ये मोठा घोटाळा झाला आहे, असा गंभीर आरोप प्रकाश शेंडगे यांनी केला आहे. आरोग्य सेवा भरतीसाठी एजंटमार्फत 15 लाख रुपयांची मागणी केल्याचा गंभीर आरोप यावेळी प्रकाश शेंडगे यांनी केला आहे. आरोग्य सेवा भरतीसाठी एजंटमार्फत 15 लाख रुपयांची मागणी करत असल्याची ऑडिओ क्लीप आता सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- राज्यातील आरोग्य सेवा भरतीत मोठा घोटाळा; प्रकाश शेंडगेंचा गंभीर आरोप
- संयुक्त किसान मोर्चासह इतर पक्ष संघटनांच्या वतीने नगर येथे रास्ता रोको
- पश्चिम महाराष्ट्रात नव तंत्रज्ञानाच्या उपयोगातून रस्त्यांचे जाळे निर्माण करणार – नितीन गडकरी
- ‘अधिकाऱ्यांनी न्यायालयाच्या अवमानाची…’, मुख्यमंत्री बिप्लब कुमार देब यांचे खळबळजनक वक्तव्य
- धर्मांतर रॅकेट : नाव बदलून राहणाऱ्या ‘आतिफ’ला ATSने नाशकातून केली अटक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

