अहमदनगर : केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्याच्या विरोधात आज संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने भारत बंदचे ऐलान करण्यात आले आहे. त्यापार्श्वभूमिवर अहमदनगर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात बसस्थानकासमोर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. संयुक्त किसान मोर्चासह कामगार संघटना, राजयकीय पक्षांनी आंदोलनात सहभाग नोंदविला.
अहमदनगर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलनात संयुक्त किसान मोर्चा, आयटक, अहमदनगर जिल्हा हमाल पंचायत, बीडी कामगार संघटनासह विविध राजकीय पक्षांनी सहभाग नोंदविला. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत रास्ता रोको केला.
केंद्राच्या तीन वादग्रस्त कृषी कायद्यांविरोधात संयुक्त मोर्चाच्या वतीने संपूर्ण भारत बंद आंदोलन सुरु आहे. या बंदला महाराष्ट्रात काँग्रेस, शिवसेना पाठोपाठ सर्वच राजकीय पक्षांनी पाठिंबा दर्शविला आहे. या बंद दरम्यान शेतकरी वेगवेगळ्या महामार्गावरील गाड्या तसेच रेल्वे लाईन अडविण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीतील वाहतूक ठप्प झाली आहे. तसेच शेतकऱ्यांनी पंजाब-हरियाणा शंभू सीमा देखील बंद केली आहे. स. ६ ते दु. ४ वाजेपर्यंत शेतकरी रस्ते अडवून निषेध करणार आहेत.
मुठ्ठी भर किसान, कुछ राज्यों का आन्दोलन बताने वाले आंख खोलकर देख ले कि किसानो के आव्हान पर आज पूरा देश #भारत_बंद का समर्थन कर रहा है, बिना किसी दबाव व हिंसा के ऐतिहासिक #BharatBand जारी है सरकार कान खोल कर लें, कृषि कानूनों की वापसी व MSP की गारंटी के बिना घर वापसी नहीं होगी ।
— Rakesh Tikait (@RakeshTikaitBKU) September 27, 2021
महत्वाच्या बातम्या
- आनंदराव अडसूळ यांना ज्या प्रकरणात ईडीने समन्स पाठवलं ते प्रकरण नेमकं आहे तरी काय ?
- मुंबई-पुणे रेल्वे मार्गावर अपघात, इंदोर-पुणे रेल्वेचे दोन डबे रुळावरून घसरले
- पश्चिम महाराष्ट्रात नव तंत्रज्ञानाच्या उपयोगातून रस्त्यांचे जाळे निर्माण करणार – नितीन गडकरी
- ‘अधिकाऱ्यांनी न्यायालयाच्या अवमानाची…’, मुख्यमंत्री बिप्लब कुमार देब यांचे खळबळजनक वक्तव्य
- धर्मांतर रॅकेट : नाव बदलून राहणाऱ्या ‘आतिफ’ला ATSने नाशकातून केली अटक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

