Share

राज्यातील आरोग्य सेवा भरतीत मोठा घोटाळा; प्रकाश शेंडगेंचा गंभीर आरोप

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राज्यातील आरोग्य विभागाची परीक्षा ऐनवेळी रद्द झाल्याने राज्यातील विद्यार्थ्यांनी राज्य सरकारवर संताप व्यक्त कैला जात आहे. त्याचबरोबर विरोधकांनीही महविकास आघाडीवर या मुद्द्यावरुन जोरदार ताशेरे ओढले. मात्र आता या सेवा भरतीमध्ये मोठा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप ओबीसीचे नेते प्रकाश शेंडगे यांनी केला आहे. याबाबतची धक्कादायक ऑडिओ क्लीप सध्या व्हायरल होत आहे.

राज्यातील आरोग्य सेवा भरतीमध्ये मोठा घोटाळा झाला आहे, असा गंभीर आरोप प्रकाश शेंडगे यांनी केला आहे. आरोग्य सेवा भरतीसाठी एजंटमार्फत 15 लाख रुपयांची मागणी केल्याचा गंभीर आरोप यावेळी प्रकाश शेंडगे यांनी केला आहे. आरोग्य सेवा भरतीसाठी एजंटमार्फत 15 लाख रुपयांची मागणी करत असल्याची ऑडिओ क्लीप आता सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. या ऑडिओ क्लीपची चौकशी व्हावी, अशी मागणीही प्रकाश शेंडगे यांनी केली आहे.

हे संपूर्ण प्रकरण धक्कादायक असून यामध्ये मोठा भ्रष्टाचार होत असल्याचं स्पष्ट होत आहे. फक्त अमरावतीमधील ही ऑडिओ क्लीप आहे. या प्रकरणाची चौकशी झाली तर संपूर्ण महाराष्ट्रातील करोडोंचा घोटाळा बाहेर येण्याची शक्यता आहे, असंही शेंडगे म्हणाले आहेत.

राज्य सरकारने ज्या कंपनीला हे कॉन्ट्रॅक्ट दिले आहे अशा न्यासा कंपनीचा मालक 84 दिवस जेलमध्ये जाऊन आला आहे. याची कल्पना राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांना होती. तरीही असं ट्रॅप रेकॉर्ड असलेल्या कंपनीच्या हाती लाखो तरुणांचं भविष्य देणं, ही कंपनी महाराष्ट्रातील मुलांना चीनचे सेंटर देते, आणि आदल्या दिवशी परिक्षा रद्द करण्याची नामुष्की राज्यावर येत आहे. एवढं सगळं होऊनही हे कॉन्ट्रॅक्ट त्याच कंपनीला द्यायचं महाराष्ट्रात नेमकं काय चाललं आहे?, असा सवाल प्रकाश शेंडगेंनी राज्य सरकारला विचारला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!