त्रिपुरा : शनिवारी(२५ सप्टें.)रवींद्र भवनात टीसीएस अधिकाऱ्यांच्या २६ व्या द्विवार्षिक परिषदेला संबोधित करत असतांना त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब कुमार देब यांनी वादग्रस्त विधान केले आहे. ‘अधिकाऱ्यांना न्यायालयाच्या अवमानाची भीती बाळगू नये. तुम्ही तुमचं काम करताना कंटेम्प्ट ऑफ कोर्टची भीती बाळगू नका, मी अशा प्रकरणांना सामोरा जाईल. न्यायालय आदेश देऊ शकते पण आदेशाचे पालन कोण करणार? कारण पोलीस माझ्या नियंत्रणाखाली आहेत’ असे ते म्हणाले आहेत.
परिषदेत बोलत असतांना ते म्हणाले की,’मला अनेक अधिकारी सांगतात की न्यायालयाचा अवमान होईल, या भीतीमुळे ते एखादे काम करू शकत नाहीत. अशी भीती कशाला? न्यायालय निर्णय देण्याचे काम करते पण पोलीस त्याची अंमलबजावणी करतात आणि पोलीस माझ्या नियंत्रणात आहेत. पोलिसांकडे त्यासाठी अनेक पद्धती आहेत आणि मी त्याचा साक्षीदार आहे’. तसेच ‘कोणालाही तुरुंगात टाकणं सोप्पं नसतं. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आदेशानुसार पोलिसांचं काम लक्षात ठेवलं जातं. जर कोर्ट पोलिसांना एखाद्या व्यक्तीला तुरुंगात टाकण्यास सांगत असेल तर आरोपी सापडलाच नाही, असे पोलिसांनी सांगायचे. शेवटी ताकद तर बापाच्या हातात असते ना,’ असेही देब म्हणाले.
दरम्यान, देब यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर टीकास्त्रांचा वर्षाव होत आहे. तसेच तृणमुल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी देब यांनी देब यांचा व्हिडिओ शेअर करत ‘देब यांनी निर्लज्जपणे लोकशाहीची थट्टा केली आहे, सन्माननीय न्यायव्यवस्थेची जाहीरपणे चेष्टा केली आहे. न्यायालयाप्रती आणि न्यायव्यवस्थेप्रती गंभीर अनादर दाखवणाऱ्या जेव यांच्या वक्तव्यांची सर्वोच्च न्यायालय दखल घेईल का?’ असा सवाल केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- आनंदराव अडसूळ यांना ज्या प्रकरणात ईडीने समन्स पाठवलं ते प्रकरण नेमकं आहे तरी काय ?
- मुंबई-पुणे रेल्वे मार्गावर अपघात, इंदोर-पुणे रेल्वेचे दोन डबे रुळावरून घसरले
- तो आवाज माझा नाहीच हे विरोधकांचे कारस्थान; सुनिल कांबळेंचे स्पष्टीकरण
- गुलाब चक्रीवादळाचा राज्यावरही परिणाम; दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा
- धर्मांतर रॅकेट : नाव बदलून राहणाऱ्या ‘आतिफ’ला ATSने नाशकातून केली अटक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

