सिडनी : स्टीव्ह स्मिथची शतकी खेळी, डेव्हिड वॉर्नर, अॅरॉन फिंच आणि मार्नस लाबुशानेच्या अर्धशतकी खेळी आणि ग्लेन मॅक्सवेलच्या फटकेबाजीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला विजयासाठी 390 धावांचं तगडं आव्हान दिलं आहे. ऑस्ट्रेलियाने निर्धारित 50 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 389 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून स्टीव्ह स्मिथने सर्वाधिक 104 धावा केल्या. तर डेव्हिड वॉर्नरने 83 धावांची खेळी केली. टीम इंडियाकडून मोहम्मद शमी, जस्प्रीत बुमराह आणि हार्दिक पांड्याने प्रत्येकी 1 विकेट घेतली.
रविवारी(२९ नोव्हेंबर) ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात दुसरा वनडे सामना झाला. सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर पार पडलेल्या या सामन्यात हार्दिक पंड्याने गोलंदाज म्हणून पुनरागमन केले आहे. विशेष म्हणजे त्याने गोलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाकडून शतकी खेळी करणाऱ्या स्टिव्ह स्मिथची विकेटही घेतली.
या सामन्यात ऑस्ट्रेलियन फलंदाज भारतीय गोलंदाजांवर भारी पडत होते. त्यात स्टिव्ह स्मिथ आणि मार्नस लॅब्यूशाने यांनी तिसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी रचली होती. ही भागीदारी तोडणे कठीण वाटत असतानाच हार्दिक गोलंदाजीसाठी आला आणि त्याने डावाच्या ४२ व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर १०४ धावांवर खेळणाऱ्या स्मिथला बाद केले. स्मिथचा झेल मोहम्मद शमीने घेतला.
महत्वाच्या बातम्या
- मराठा आरक्षण : फडणवीसांनी करुन दाखवलं, पण त्यांना नावं ठेवली : उदयनराजे भोसले
- ‘एखाद्या नटीचे बांधकाम पाडणे हे बेकायदेशीर, तर बहुमतातील सरकार पाडण्याचे प्रयोग…’
- ‘3 वर्षांपर्यंत कोविड सेस लावा’, केंद्र सरकारला मिळाल्या अनोख्या सूचना !
- कृषी सुधारणांमुळे शेतकऱ्यांसाठी नव्या संधींची दारे उघडली गेली : नरेंद्र मोदी
- ‘तारों के शहर में’ गाण्यावर डान्सच्या माध्यमातून अंकिता सुशांतला देणार ट्रिब्यूट
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

