Share

मोदींनी त्या चुमुकल्याच्या कलेचे सोबतच देशभक्तीचं  केलं भरभरून कौतुक 

Published On: 

परभणी : पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांनी परभणी शहरातील वैभवनगर येथील बालविद्या मंदिर मध्ये इयत्ता सहावीत शिकणार्‍या अजय डाके या विद्यार्थ्याच्या कलागुणांचे कौतूक केले आहे. नरेंद्र मोदींनी अजय डाकेला पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. अजयने सहज सुचले म्हणून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांना पत्र पाठवले होते.

पत्रासोबत पंतप्रधानांचे स्वत: काढलेले पेन्सिल स्केच पाठवले. या पत्राला पंतप्रधान कार्यालयाकडून पत्राद्वारे उत्तरही आले. हे स्केच खूप आवडल्याचे मोदींनी आपल्या पत्रात लिहिलय. स्वप्नवत वाटणारी ही घटना प्रत्यक्षात उतरल्याने अजयच्या कुटुंबालाही आश्चर्य वाटले आणि सर्वांच्याच आनंदाला पारावार उरला नाही

पंतप्रधान मोदींनी अजय डाकेला लिहिलेल्या पत्रात तुझ्या कलाकृतीबरोबरच, पत्रात व्यक्त केलेली देशाबद्दलची भावना, तुझ्या विचारांची सुंदरता देखील प्रकट करत असल्याचं सांगितलं आहे. पंतप्रधानांनी अजयला सल्ला दिला, की तो त्याच्या या कलेचा वापर समाजात जागरूकता आणण्यासाठी करू शकतो. अजय यानं कलेच्या माध्यमातून मित्र आणि आसपासच्या लोकांना सामाजिक संबंधांच्या मुद्यांप्रती सजग करण्याचा प्रयत्न करशील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!