मुंबई : दाक्षिणात्य दिग्दर्शक राजामौली यांचा आगामी महत्वाकांक्षी चित्रपट आरआरआर या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहे. या वर्षी ऑक्टोबर १३ तारखेला दसऱ्याच्या मुहुर्तावर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. काही दिवसापुर्वीच ज्युनीअर एनटीआरच्या वाढदिवशी प्रदर्शित केलेल्या एका पोस्टरमुळे हा चित्रपट पुन्हा चर्चेत आला होता.
मात्र आता हा चित्रपट पुन्हा एकदा चर्चेत आला आहे आणि तेही कमाईमुळे. हा चित्रपट प्रदर्शित होण्यापुर्वीच या चित्रपटाचे सॅटेलाईट हक्क हे विक्रमी किमतीत विकले गेल्याची माहिती समोर आली आहे. एका बॉलीवूडच्या सुत्रानुसार या चित्रपटाच्या हिंदी आवृत्तीसाठी १४० कोटी रुपये मोजले असल्याची माहिती समोर आली आहे. तर इतर भाषा आणि हिंदी भाषेच्या आवृत्तीचे हक्क एकुण ३२५ कोटी रुपयांना झी ग्रुपला विकले गेले असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र याबाबत अद्यापही कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नाही.
आरआरआर या चित्रपटाचे दिग्दर्शन हे एस एस राजामौली करत असुन या चित्रपटाद्वारे आलिया भट्ट दक्षिण चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे. आलियासह या चित्रपटात ज्युनिअर एनटीआर आणि राम चरण एकत्र मोठ्या पडद्यावर दिसणार आहेत. या चित्रपटात अजय देवगण, श्रिया सरन, समुथिरकानी आलिया भट्ट, राम चरण आणि ज्युनिअर एनटीआर आणि अॅलिसन डूडी यांच्यासह अनेक भारतीय कलाकारांचा या चित्रपटात समावेश आहे.
महत्वाच्या बातम्या
- जालन्यात ३८२ कोरोनाबाधित तर २४० कोरोनामुक्त!
- ‘आता राष्ट्रपती, पंतप्रधानांसाठी बेड्स राखीव ठेवण्याची गरज’, दिल्ली हायकोर्टाचे मत
- फडणवीसजी, लसी मिळवण्यात गुजरातचा स्ट्राइक रेट महाराष्ट्रापेक्षा जास्त कसा ? – सचिन सावंत
- तुमचे अश्रू म्हणजे फक्त एक इव्हेंट; मोदीजी, ‘त्या’ जनतेचे अश्रू आठवा – चाकणकर
- ‘एकनाथ शिंदेंनी चांगलं काम केलं, पण उद्धव ठाकरे मात्र कपड्याची इस्त्रीही मोडू न देता मुंबईत परतले’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

