Share

जालन्यात ३८२ कोरोनाबाधित तर २४० कोरोनामुक्त!

Published On: 

जालना: जिल्ह्यात गेल्या आठवड्यापेक्षा या आठवड्यात कोरोना बाधितांची संख्या तुलनेने कमी येत आहे तसेच कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांचे देखील प्रमाण वाढले असल्याने जालना वासियांना काहीसा दिलासा मिळत आहे, मात्र असे असले तरी मृत्यू दर काही कमी होत नाहीये त्यामुळे चिंता कायम आहे. शुक्रवारी दिवसभरात ११ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. कोरोनाचा संसर्ग वाढू नये या साठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना प्रशासन करत आहे.

जिल्ह्यात चालू आठवड्यात कोरोना रुग्णांमध्ये काहीशी घट होताना दिसत असली तरी मृत्यूचे सत्र सुरूच आहे. शुक्रवारी दिवसभरात उपचारादरम्यान ११ जणांचा मृत्यू झाला, तर नव्या ३८२ रुग्णांची नोंद झाली. तसेच बरे झालेल्या २४० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. जालना शहर ६१, अांतरवाला २, वझर १, बाजीउम्रद १, बठाण १, वझर १, बोरखेडी १, चंदनझिरा १०, दरेगाव २, देवमूर्ती २, देवमूर्ती २, धांडेगाव १, धनगर पिंपरी १, धानोरा, धारा १, जळगाव सोमनाथ २, केळीगव्‍हाण १, कुंभेफळ ३, लोंढेवाडी २, मालेगाव १, मालेगाव १, मोतीगव्‍हाण १, पोखरी १ व इतर ग्रामीण भागातून अशीच कोरोना बाधितांची संख्या समोर आली आहे.

आरटीपीसीआरद्वारे ४२१ तर अँटीजेन तपासणीद्वारे ६७ असे एकूण ४८८ अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अर्चना भोसले यांनी दिली. जिल्ह्यात आतापर्यंत ३ लाख ३४ हजार २२४ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यापैकी ५८ हजार २९५ अहवाल पॉझिटिव्ह, तर २ लाख ७३ हजार ४९७ निगेटिव्ह आले. तसेच प्रयोगशाळेत एकूण २१०० नमुने प्रलंबित आहेत. आतापर्यंत एकूण ५२ हजार ८७७ रुग्ण कोरोनातून बरे झाले असून ९७१ रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या अॅक्टिव्ह ४ हजार ४४७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!