दुबई : इंडियन प्रीमियर लीगचे उर्वरित सामने आजपासून पुन्हा एकदा सुरु झाले आहेत. आयपीएलच्या चौदाव्या हंगामाचा दुसरा टप्पा महत्वाच्या दोन संघांच्या टक्करने सुरु झाली आहे. चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध मुंबई इंडियन्सचा हायवोल्टेज सामना सुरु झाला असून चेन्नईने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
सलामीवीर ऋतुराज गायकवाड वगळता सलामीचे फलंदाज एकामागे एक माघारी परतल्याने चेन्नईची फलंदाजी पुरती ढासळल्याचे पाहायला मिळाले. मात्र, मुंबई इंडियन्स समोर आव्हानात्मक खेळी उभी करण्यासाठी मूळचा पुण्याचा असलेला ऋतुराज गायकवाडने झुंजार अर्धशतकी खेळी केली आहे. रवींद्र जडेजा वगळता ऋतुराजला आतापर्यंत चांगली साथ दुसऱ्या फलंदाजाने दिलेली नाही.
रवींद्र जडेजा हा ३३ चेंडूंमध्ये २६ धावा करून बाद झाला. तर, ऋतुराज गायकवाड याने ५८ चेंडूंमध्ये मोलाच्या ८८ केल्या आहेत. अर्धा संघ हा दोन आकडी धावा ही न गाठता माघारी परतला. यात महत्वाचं म्हणजे ज्या दिग्गज खेळाडूंकडून अपेक्षा होती ते भोपळा देखील पूर्ण करू शकलेले नाहीत. फाफ डुप्लेसिस, मोईन अली, अंबाती रायडू हे तीन दिग्गज खेळाडू शून्यावर बाद झाले आहेत. दरम्यान, मुंबईसमोर विजयासाठी १५७ धावांचे लक्ष्य आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ही भूमी छत्रपती शिवरायांची आहे, मुघलांची नाही; सोमय्यांवरील कारवाईवरून भाजप आक्रमक
- पुणेकरांना बाप्पा पावला; गणेशोत्सवाच्या दहा दिवसांत कोरोनामध्ये वाढ नाही – मुरलीधर मोहोळ
- ‘ठाकरे सरकारच्या ठोकशाहीचा कळस; सोमय्या बोलायला लागल्यावर एवढी का भिती वाटते?’
- काँग्रेसचे धक्कातंत्र; चरणजीत सिंग चन्नी होणार पंजाबच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान
- ‘लगे रहो किरीटजी, इनकी बजाते रहो’; नितेश राणे यांचे खोचक ट्विट
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

