🕒 1 min read
मुंबई: श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या T20 सामन्यात ऋतुराज गायकवाड खेळणार असे स्पष्ट असताना तो खेळू शकला नाही. पहिल्या सामन्यात ऋतुराज खेळणार असल्याचे सगळ्यांना माहिती होते. मात्र त्याला पहिल्या सामन्यातून बाहेर पडावे लागले. यासंबंधी चर्चाना पूर्णविराम लावत बीसीसीआयने कारण स्पष्ट केले आहे.
भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेकवेळी सांगितले की, गायकवाडला खेळायचे होते पण मनगटाच्या समस्येमुळे तो खेळु शकत नाहीये. तसेच बीसीसीआयने ऋतुराजच्या दुखापतीबाबत एक अपडेट ट्विट केले: “ऋतुराज गायकवाडने उजव्या हाताच्या मनगटात दुखत असल्याची तक्रार केली, ज्यामुळे त्याच्या फलंदाजीवर परिणाम होत आहे. तो पहिल्या T20 सामन्यातील निवडीसाठी अनुपलब्ध होता. बीसीसीआय वैद्यकीय पथक त्याची तपासणी करत आहे.”
UPDATE – Ruturaj Gaikwad complained of pain in his right wrist, which is affecting his batting. He was unavailable for selection for the first T20I. The BCCI Medical Team is examining him.@Paytm #INDvSL
— BCCI (@BCCI) February 24, 2022
भारतीय व्यवस्थापनाला चिंता आहे की ही फार मोठी दुखापत नसावी कारण जर गायकवाड गंभीर जखमी झाला असेल तर तो मालिकेतून बाहेर पडेल आणि सूर्यकुमार यादव आणि दीपक चहर यांच्या यादीत येईल. जे त्यांच्या संबंधित दुखापतीमुळे आधीच मालिकेतून बाहेर पडले आहेत. भारतीय संघाने पहिला टी २० सामना जिंकला आहे. तरी भारतीय क्रिकेट रसिकांना दुसऱ्या सामन्यात ऋतुराजला खेळताना पाहायची आशा आहे.
महत्वाच्या बातम्या
- Russia-Ukraine war : युद्धजन्य परिस्थितीतही ‘हा’ अभिनेता करतोय युक्रेनमध्ये माहितीपटावर काम
- किरीट सोमय्यांचे मोठे वक्तव्य; म्हणाले, ‘उद्धव ठाकरे व सोनिया गांधी या दोघांसाठी आर्थिक…’
- “रामराज्य येण्याची मुहूर्तमेढ सुरु झाली आहे”, आशिष शेलारांचे मोठे वक्तव्य
- VIDEO: विकेट घेतल्यानंतर सर जडेजाने केले “पुष्पाराज” स्टाईलने सेलिब्रेट
- कर्माची परतफेड करावीच लागते; उदयनराजेंचा नवाब मलिकांना अप्रत्यक्ष टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
