🕒 1 min read
नवी दिल्ली: रशियाने गुरुवारी युक्रेनवर चौफेर हल्ले करत ७४ लष्करी तळं उद्ध्वस्त केले असून त्यात ४० सैनिकांसह १० नागरिक ठार झाले आहेत. अशा भयावह आणि युद्धजन्य परिस्थतीतही चित्रपट निर्माता आणि अभिनेता शॉन पेन (Actor Sean Penn) यांनी युक्रेनमध्ये चालू असलेल्या रशियन हल्ल्याबद्दल माहितीपटावर काम सुरू ठेवलं आहे.
दरम्यान अभिनेता शॉन पेन यांनी पत्रकार परिषेदत हजेरी लावत उपपंतप्रधान इरिना वेरेश्चुक (Iryna Vereshchuk) यांची भेट देखील घेतली आहे. तसेच त्यांनी युद्ध पार्श्वभूमीवर पत्रकार, लष्करी कर्मचाऱ्यांशी रशियन आक्रमणाबद्दल चर्चाही केली असल्याचे राष्ट्रपती कार्यालयाने गुरुवारी फेसबुक पोस्टद्वारे म्हटले आहे.
या पोस्टमध्ये म्हटले आहे की,”शॉन पेन यांच्यासारखे धैर्य इतरांकडे विशेषत: पाश्चात्य राजकारण्यांकडे कदापी नाही. सध्या युक्रेनमध्ये घडत असलेल्या सर्व घटनांची नोंद करण्यासाठी आणि रशियाच्या आपल्या देशावरील आक्रमणाबद्दल जगाला सत्य सांगण्यासाठी दिग्दर्शक पेन किवमध्ये आले आहेत.” दरम्यान ऑस्कर विजेते पेन हे गेल्या अनेक वर्षांपासून अनेक आंतरराष्ट्रीय मानवतावादी आणि युद्धविरोधी प्रयत्नांमध्ये सहभागी असल्याचे दिसून येते.
महत्वाच्या बातम्या:
-
किरीट सोमय्यांचे मोठे वक्तव्य; म्हणाले, ‘उद्धव ठाकरे व सोनिया गांधी या दोघांसाठी आर्थिक…’
-
“रामराज्य येण्याची मुहूर्तमेढ सुरु झाली आहे”, आशिष शेलारांचे मोठे वक्तव्य
-
VIDEO: विकेट घेतल्यानंतर सर जडेजाने केले “पुष्पाराज” स्टाईलने सेलिब्रेट
-
कर्माची परतफेड करावीच लागते; उदयनराजेंचा नवाब मलिकांना अप्रत्यक्ष टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
