🕒 1 min read
मुंबई: श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या T20 सामन्यात भारतीय फलंदाजांनी अप्रतिम खेळ दाखवला. विशेषत: इशान किशनने ८९ धावांची तुफानी खेळी खेळली, याशिवाय श्रेयस अय्यरनेही नाबाद ५६ धावांची खेळी केली. यानंतर भारतीय गोलंदाजानेही अप्रतिम कामगिरी करत श्रीलंकेच्या फलंदाजांची दमछाक केली. दुसरीकडे, ब-याच दिवसांनी संघात पुनरागमन करणाऱ्या रवींद्र जडेजाने आपल्या चांगल्या फलंदाजीने अप्रतिम कामगिरी केली नाही, परंतु आपल्या गोलंदाजीने दिनेश चंडिमलची यानंतर जडेजाने ‘पुष्पा झुकेगा नही’ स्टाईलमध्ये सेलिब्रेशन करून चाहत्यांची मने जिंकली आहे.
जडेजाने (ravindra jadeja) १०व्या ओव्हरमध्ये चंडीमलला यष्टीचीत करून पॅव्हेलियनमध्ये परतवल. जडेजाच्या या पुष्पा सेलिब्रेशनच्या या स्टाइलने मेहफिल लुटली आहे. जडेजा बऱ्याचदा अर्धशतक झळकावल्यानंतर तलवार फिरवल्यासारखी बॅट फिरवतो. हि त्याची ट्रेडमार्क स्टाईल बनली आहे. तसेच पुष्पाची क्रेज सुरु असताना त्यानेही विकेट मिळाल्यानंतर पुष्पाच्या अंदाजात सेलिब्रेट करणे पसंत केले आहे. जडेजाने याआधीही पुष्पा सारखा लूक केला होता.
Ravindra Pushpa Raj ???? @imjadeja#INDvSL #WhistlePodu ????????
???? : @BCCI pic.twitter.com/busnyI29ms— Chennai Super Kings (@ChennaiIPL) February 24, 2022
https://www.instagram.com/p/CaXb3OaA5oR/?utm_source=ig_web_copy_link
‘मैं झुकेगा नहीं’ हा डायलॉग अलीकडेच रिलीज झालेल्या अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’ (pushpa) चित्रपटातील आहे. ‘पुष्पा’ चित्रपटाच्या या डायलॉगने खळबळ माजवली आहे. अशा परिस्थितीत, जडेजाने विकेट घेतल्यानंतर, या कृतीची पुनरावृत्ती केल्याने चाहत्यांना वेड लावले आहे. सीएसकेने त्याच्या ट्विटरवर जडेजाची ‘मैं झुकेगा नहीं’ ऍक्शन करताना जडेजाचा फोटो शेअर केला आहे. तसेच त्याचे फोटो आणि व्हिडीओही व्हायरल होत आहेत.
महत्वाच्या बातम्या
- Russia-Ukraine War : “प्रिय पुतिन, मी तुझी आई असती तर…”; अभिनेत्रीची अजब इच्छा
- Russia-Ukraine war : “आम्हाला युद्धात एकटं पाडण्यात आलं”, युक्रेनच्या राष्ट्रध्यक्षांची खंत
- ‘युक्रेन-रशिया युद्धाचा परिणाम अर्थव्यवस्थेवर होणार’ – उदयनराजे भोसले
- भाजपचे नेते धुतल्या तांदळासारखे स्वच्छ आहेत का?- संजय राऊत
- IND vs SL : भारतीय संघाने पहिल्या सामन्यात श्रीलंकेला पराभूत करत रचले अनेक विक्रम
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

