सातारा: राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते तसेच राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना ईडीने आठ तास चौकशी केल्यानंतर अटक केली. त्यानंतर न्यायालयात दोन्ही बाजू मांडण्यात आल्या आणि त्यानंतर नवाब मलिक यांना ३ मार्च पर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. या मुद्द्यावरून महाविकास आघाडी सरकारचे नेते आक्रमक झाले आहेत.
दुसरीकडे भाजप नेत्यांनी मलिकांच्या मंत्रीपदाच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली आहे. यासाठी भाजप नेत्यांनी राज्यभरात आंदोलन देखील केले. या पार्श्वभूमीवर खासदार उदयन राजे भोसले यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. कर्माची परतफेड करावीच लागते, अशा शब्दात भोसले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
महत्वाच्या बातम्या:
Russia-Ukraine war : “आम्हाला युद्धात एकटं पाडण्यात आलं”, युक्रेनच्या राष्ट्रध्यक्षांची खंत
‘युक्रेन-रशिया युद्धाचा परिणाम अर्थव्यवस्थेवर होणार’ – उदयनराजे भोसले
IND vs SL : भारतीय संघाने पहिल्या सामन्यात श्रीलंकेला पराभूत करत रचले अनेक विक्रम
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

