Share

Russia Ukraine War : रशियाचा पुन्हा युक्रेनियन शाळेवर बॉम्ब हल्ला

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा: रशिया आणि यूक्रेन यांच्यातील युद्धाचा आज २५वा दिवस आहे. रशियाचे हल्ले आजही सुरूच आहेत. आज रशियाने यूक्रेनमधील मारियुपोल शहरातील एका आर्ट स्कूलवर बॉम्ब हल्ला केला आहे. त्या शाळेत 400 लोक थांबले असल्याची माहिती आहे. युक्रेनच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या हल्ल्यात शाळा पूर्णपणे उद्धवस्त झाली आहे. कोसळलेल्या इमारातीखाली 400 लोक दबले असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. परंतु मृतांची आणि जखमींची ठोस संख्या अजून समजलेली नाही.

युक्रेनच्या मारियुपोल या शहराला वेढा घातला असून तेथे होणारा पाणीपुरवठा, वीज आणि इतर सुविधा बंद करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान रशियाच्या लष्कराने म्हटले आहे की त्यांनी लांब पल्ल्याच्या हायपरसोनिक आणि क्रूझ क्षेपणास्त्रांनी युक्रेनमधील लष्करी तळांना लक्ष्य केले आहे. रशियाच्या संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते मेजर जनरल इगोर कोनाशेन्कोव्ह यांनी रविवारी सांगितले की, किन्झाल हायपरसॉनिक क्षेपणास्त्राने काळ्या समुद्राच्या किनार्‍यावरील मायकोलेव्ह बंदराजवळील कोस्टियनटिनिवका येथील युक्रेनच्या इंधन डेपोवर हल्ला केला. रशियाने सलग दुसऱ्या दिवशी किंजल क्षेपणास्त्राचा वापर केला आहे, असा दावा रशियाकडून करण्यात येत आहे.

39000 लोकांनी मारियुपोल सोडले

युक्रेनमधील मारियुपोल शहरात युद्धविराम जाहीर केला नसतानाही एका आठवड्यात 39,000 हून अधिक लोकांनी शहर सोडले आहे. रशियन सैन्याच्या सततच्या हल्ल्यांमुळे 8,000 हून अधिक खाजगी गाड्या मारिओपोलहून झापोरिझियाच्या दिशेने निघाल्या आहेत, असे सांगण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!