🕒 1 min read
मुंबई : आज कोकणासह घाट परिसर आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत पावसासाठी पोषक हवामान तयार झाले आहे. मागील जवळपास दोन आठवडे सलग तापमान वाढीनंतर राज्यात पावसाचं वातावरण निर्माण झालं आहे. हवामान खात्याने आज पुण्यासह मुंबई, पालघर, ठाणे, नाशिक, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सोलापूर या बारा जिल्ह्यात पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
आज सकाळपासूनच या जिल्ह्यात ढगाळ हवामानाची नोंद झाली आहे. तसेच कमाल तापमानात देखील किंचित घट झाली आहे. येत्या काही तासांत संबंधित जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी बरसणार आहेत. उर्वरित राज्यात मात्र कोरडं हवामान राहणार असून उन्हापासून देखील काहीसा दिलासा मिळणार आहे.
उद्यापासून राज्यात कमी अधिक प्रमाणात हीच स्थिती कायम राहणार आहे. मंगळवार आणि बुधवारी दोन्ही दिवशी दक्षिण कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. दुसरीकडे, सध्या बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाची स्थिती निर्माण झाल्याने पुढील दोन दिवस मच्छिमारांनी मासेमारी करण्यासाठी दक्षिण-पश्चिम बंगालच्या उपसागरात जाऊ नये, विशेष काळजी घेण्यास सल्ला हवामान तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
