Share

रसेल नंतर आता डुप्लेसीसने केली पीसीएलची ‘या’बाबतीत स्तुती, म्हणाला

Published On: 

मुंबई : ‘इंडियन प्रिमीअर लीग’ बीसीसीआयच्या या लीगने जगभरातील क्रिकेटचा चेहरामोहराच बदलुन टाकला. क्रिकेट जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड म्हणून ओळखला जाणारा बीसीसीआयची आयपीएल स्पर्धा मिलीनय डॉलर बेबी म्हणून ओळख आहे. ही स्पर्धा जगातील सर्वोत्कृष्ट स्पर्धा असल्याचे मत अनेक क्रिकेट जाणकारानी व्यक्त केले आहे.

यादरम्यान काही दिवसापुर्वी वेस्ट इंडिजचा अष्टपैलु आणि आयपीएलमध्ये केकेआर संघाकडून खेळणारा आंद्रे रसेलने पाकिस्तान प्रिमीयर लीग ही आयपीएलपेक्षा उत्कृष्ट असल्याचे मत मांडले होते. आता दक्षिण अफ्रिकन फाफ डुप्लेसीसीनेही पीसीएलचे कौतुक केले आहे. पीसीएल स्पर्धेची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे या स्पर्धेतील वेगवान गोलंदाज. या स्पर्धेतील वेगवान गोलंदाजीचा स्तर हा आयपीएलपेक्षा चांगला असल्याचे डुप्लेसीस म्हणाला आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने हे वक्तव्य केले आहे.

यावेळी बोलताना तो पुढे म्हणाला की,’पीसीएलमधील बहुतेक गोलंदाज हे १४० किमीच्या वेगाने गोलंदाजी करतात. याच्याउलट आयपीएलमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या फिरकी गोलंदाजाचा सामना करावा लागतो. पीसीएलमध्ये दर्जेदार वेगवान गोलंदाज आसतात तर आयपीएलमध्ये दर्जेदार फिरकीपटु असतात.’ मुळचा दक्षिण अफ्रिकेचा खेळाडू असलेला फाफ डु प्लेसिस हा आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सकडुन खेळत असतो. तर पीसीएलमध्ये तो क्वेटा ग्लॅडीएटर्सकडुन खेळत असतो.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!