पटना: महागाई मुळे सामन्यांच्या खिशाला दररोज कात्री लागत असताना गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेली इंधन दरवाढ आज देखील कायम आहे. शंभरीच्या जवळ गेलेल्या पेट्रोल आणि डीझेल मध्ये सातत्याने वाढ कायम आहे. काही शहरांमध्ये पेट्रोलने या आधीच शंभरी पार केली आहे. या विरोधात सामान्यांसह विरोधी पक्ष देखील आक्रमक होत आहेत.
या इंधन दरवाढी वरून विरोधक केंद्र सरकारवर निशाणा साधत असून इंधन दरवाढीविरोधात निषेध म्हणून आरजेडी नेते तेजस्वी यादव यांनी पटना येथील सचिवालयात आपल्या निवासस्थानावरून दुचाकी चालविली. सध्या देशभरात विरोधक इंधन दरवाढी वरून सरकारला धारेवर धरत आहेत.
#WATCH Bihar: RJD leader Tejashwi Yadav rides a bicycle from his residence to the Secretariat in Patna, as a mark of protest against the fuel price hike. pic.twitter.com/Db9muIwHEw
— ANI (@ANI) February 26, 2021
दरम्यान, आगामी काळात पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका आल्या असून सत्ताधारी-विरोधक एकमेकांना खिंडीत पकडण्याची एकही संधी सोडत नसल्याचे चित्र आहे. तर सध्या देशभर सध्या इंधन दरवाढीचा मुद्दा गाजत आहे. कॉंग्रेस तसेच इतर विरोधी पक्ष देखील केंद्र सरकारकडून होत असलेल्या पेट्रोलच्या दरवाढीचा सतत विरोध करत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- रस्त्यावर तलवारीने केक कापने महागात, १३ जणांवर गुन्हा
- युवराज सिंगची खेळपट्टीवर टीका; मायकेल वॉनची म्हणाला…
- थेट हात जोडत सुभाष देसाई यांनी वनमंत्री राठोड यांच्यावर बोलण टाळल
- प्रियदर्शिनीतील झाडांची काळजी शिवसेना घेईल-पालकमंत्री देसाई
- ‘कसोटी सामान दोन दिवसात संपवला आता अदानी पोर्ट, रिलायन्स रिफायनरीत फिरायला जा’ ! जाफरची मजेशीर स्टोरी


