पुणे: रयत शिक्षण संस्था आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावरून राजकीय नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचे सामने बघायला मिळत आहे. साताऱ्यात शिवसेना आमदार महेश शिंदे (Mahesh Shinde) यांनी माझी उंची शरद पवारांची उंचीपेक्षा दोन इंच लहान आहे असे म्हंटले होते. यावरून राष्ट्रवादी काँग्रसचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी महेश शिंदेंनी आपला मेंदु तपासून पाहावा असे म्हंटले. आता या वादात भाजप नेत्यांनी देखील उडी मारली आहे.
बाळासाहेबांनी उंची व्यवस्थित
मोजली होती… pic.twitter.com/3sImqtgqWg— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) January 12, 2022
भाजप नेते अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,’बाळासाहेबांनी उंची व्यवस्थित मोजली होती.’ तसेच या ट्विटसोबत त्यांनी सामना वृत्तपत्राच्या जुन्या अंकाचा फोटो टाकला आहे. यामध्ये बाबासाहेब ठाकरेंच्या सभेचा फोटो असून ‘निश्चयाचा महामेरु कसले, पवार तर सोनियांचे पायधरू’,असे या बातमीचे शीर्षक आहे. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर देखील टीका केली आहे.
ज्या बाळासाहेबांचे बोट धरून भाजपा महाराष्ट्रात मोठी झाली त्याच बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसून शिवसेना संपवायला निघालेल्याची उंची महाराष्ट्राने पहिली …
कंगनाची हुजरेगिरी करणाऱ्यांना बाळासाहेबांचे नाव घेण्याचा अधिकार नाही …— Rupali patil thombare (@Rupalispeak) January 13, 2022
आता भाजप नेते अतुल भातखळकर यांनी केलेल्या टीकेला राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या रूपाली पाटील ठोंबरे (Rupali Patil Thombre) यांनी ट्विट करत प्रत्युत्तर दिले आहे. रूपाली पाटील ठोंबरे यांनी ट्विट करत म्हणलं आहे की, ज्या बाळासाहेबांचे बोट धरून भाजपा महाराष्ट्रात मोठी झाली त्याच बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसून शिवसेना संपवायला निघालेल्याची उंची महाराष्ट्राने पाहिली तसेच कंगनाची हुजरेगिरी करणाऱ्यांना बाळासाहेबांचे नाव घेण्याचा अधिकार नाही, असा टोला देखील यावेळी लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या:
लॉकडाऊनवर बनवलेल्या “या” चित्रपटाच्या प्रदर्शनावर निर्बंधांचं सावट; दिग्दर्शक भांडारकर चिंतेत
“बाळासाहेबांनी उंची व्यवस्थित मोजली होती”, रयत शिक्षण संस्थेच्या वादावरून भातखळकरांचे टीकास्त्र
“शरद पवारांच्या अडमुठ्या धोरणामुळे ६७ एसटी कर्मचाऱ्यांचा जीव गेला”, सदावर्तेंचा गंभीर आरोप
कोरोनाचा हाहाकार; केंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वीच ७१८ कर्मचारी पॉझिटिव्ह
लसीकरणाचं घटतं प्रमाण चिंताजनक; आरोग्यमंत्र्यांनी व्यक्त केली चिंता
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

