🕒 1 min read
मुंबई : दीड महिन्याच्या प्रतीक्षेनंतर अखेर आज महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारचा मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आहे. आज पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आला आहे. शिंदे गटातील आणि भाजपातील एकूण १८ आमदार आज मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे यात एकाही ही अपक्ष आमदाराचा समावेश नाही. तसेच या मंत्रिमंडळात एकाही महिला आमदाराला स्थान देण्यात आलेलं नाही, तर टीईटी घोटाळ्यात नाव आलेले अब्दुल सत्तार आणि पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात नाव आलेले संजय राठोड या दोघांनाही मंत्रिपद दिल्यामुळे विरोधक आक्रमक झाले आहेत. यातच आता काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे.
“सरकार स्थापनेनंतर एक दीड महिन्यानंतर शिंदे फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला आहे. त्यांच्यातील खात्याचे वाद संपले असतील अशी अपेक्षा आहे. नवे मंत्रिमंडळ कायदेशीर की बेकायदेशीर ते सर्वोच्च न्यायालय ठरवेल पण तूर्तास नव्या मंत्रिमंडळाला शुभेच्छा! पण या सगळ्यात एक खटकणारी गोष्ट आहे, ती म्हणजे हे सरकार महिलांच्याबाबतीत संवेदनशील आहे कि नाही?, हा प्रश्न पडतो. मंत्रिमंडळात एकाही महिला आमदाराला स्थान नाही. त्या उलट महिलेवर अत्याचाराचे आरोप असलेल्यांचा समावेश मंत्रिमंडळात करण्यात आला आहे. त्यांना सन्मानाचं स्थान देण्यात आले, हे कुणालाही आवडण्यासारखं नाही.”, असं मत बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले आहे.
सरकार स्थापनेनंतर एक दीड महिन्यानंतर शिंदे फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला आहे त्यांच्यातील खात्याचे वाद संपले असतील अशी अपेक्षा आहे. नवे मंत्रिमंडळ कायदेशीर की बेकायदेशीर ते सर्वोच्च न्यायालय ठरवेल पण तूर्तास नव्या मंत्रिमंडळाला शुभेच्छा! @INCMaharashtra @INCIndia pic.twitter.com/65pnrERvn6
— Balasaheb Thorat (@bb_thorat) August 9, 2022
नाना पटोलेंचीही टीका
पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात तत्कालीन मंत्री संजय राठोड यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. तशी मागणी भाजपानेच केली होती. त्याच संजय राठोड यांना भाजपाच्या या सरकारमध्ये पुन्हा मंत्री करण्यात आले. टीईटी घोटाळ्यात नाव आलेले आमदार अब्दुल सत्तार यांनाही मंत्रिमंडळात स्थान दिले. म्हणजेच या सरकारमध्ये भ्रष्टाचाऱ्यांना मानाचे स्थान दिले जात आहे. इतर पक्षातील नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करायचे, ईडी, सीबीआयकडून त्यांची चौकशी करायची. सरकारी यंत्रणांना हाताशी धरून कारवाया करण्यास सांगायचे आणि आता स्वतःच्या सरकारमध्ये भ्रष्टाचार करणाऱ्यांना मंत्रिपद द्यायचे, यातून भाजपाचा खरा चेहरा समोर येतो. तसेच या सरकारकडे नुकसानग्रस्त नागरिकांना मदत करायला पैसे नाहीत. पण मोंदींचा ड्रिम प्रोजेक्ट असलेल्या बुलेट ट्रेनसाठी 6 हजार कोटी रुपये आहेत, अशी जहरी टीका नाना पटोले यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या:
- Bihar Political Crisis | मोठी बातमी! “BJP-JDU युती संपली” ; आमदारांच्या भेटीनंतर नितीश कुमारांची घोषणा
- Eknath Shinde । संजय राठोडांचा मंत्रिमंडळात समावेश केल्यानंतर एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण
- Asia Cup 2022 : आयपीएलनंतर एकही सामना खेळला नाही, तरीही मिळाली संघात जागा!
- Duniyadari | तेरी मेरी यारी…; दोस्तीचं वेड लावायला पुन्हा येतोय ‘दुनियादारी’
- Yashomati Thakur | हे ‘व्हाईट वॉश’ मंत्री मंडळ आहे का? ; यशोमती ठाकूर यांचा सवाल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
