Share

‘ज्यांच्याकडे महाराष्ट्र सैनिकांची एवढी सुरक्षा आहे; त्यांची झेड सुरक्षा काढून काय तीर मारणार’

Published On: 

पुणे : माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेत मोठी कपात करण्यात आली आहे. राज्य सरकारने नुकताच हा निर्णय घेतला आहे. फडणवीसांच्या सुरक्षा ताफ्यात देण्यात आलेली बुलेटप्रुफ गाडीसुद्धा काढून घेण्यात येणार आहे.

विशेष म्हणजे मुंबई पोलिसांनी फडणवीस यांच्या जिवाला धोका असल्याचा अहवाल यापूर्वीच दिला होता. त्यानंतरसुद्धा त्यांच्या सुरक्षेत कपात करण्यात आली आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत ठाकरे सरकारने हा निर्णय घेतला आहे. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांच्या सुरक्षेत कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.

सर्वात लक्षणीय बाब म्हणजे राज ठाकरे यांना झेड श्रेणीची सुरक्षा आहे. त्याऐवजी आता वाय प्लस सुरक्षा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, हे वृत्त समोर येताच ठाकरे सरकारवर टीकेची झोड उठविण्यात आली आहे. मनसेच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी या मुद्द्यावरून सरकारला लक्ष्य केले आहे.

ज्याच्या कडे एवढी महाराष्ट्र सैनिकांची सुरक्षा आहे त्यांची काय झेड सुरक्षा काढून तीर मारणार आहात. शेवटी महविकास आघाडी पण भाजप सारखी कुच्या मनाचीच ना…वेगळे काय केले तुम्ही भाजप सत्तेत असताना त्यांनी असेच नीच खेळया केल्या.. आता महविकास आघाडीने तेच नीच खेळया…निषेध..असं रुपाली पाटील ठोंबरे यांनी यांनी म्हटलं आहे.

तर दुसरीकडे भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी सरकारला खडेबोल सुनावले आहेत. महाविकास आघाडी सरकारला मुळातच देवेंद्र फडणवीसांची लोकप्रियता खुपत आहे. त्यामुळे आकस बुद्धीने त्यांनी हा निर्णय घेतला आहे. देवेंद्रजी साहेबांच्या सोबत या महाराष्ट्रातील पीडित,उपेक्षित,गोरगरीब जनतेचे आशीर्वाद आहेत व तेच त्यांचे सुरक्षा कवच आहे असं त्यांनी ठणकावून सांगितले आहे.

पुढे ते म्हणाले,त्यांना या सुरक्षेची मुळातच गरज नाही.जे लोक घराभोवती सुरक्षा घेऊन घरात बसले आहेत त्यांची सुरक्षा काढण्याची खरी गरज आहे.महाविकास आघाडी कपटनितीने व सूडबुद्धीने हा निर्णय घेतंय हे महाराष्ट्राच्या जनतेच्या लक्षात येतंय.

भाजप आमदार राम कदम यांनी ठाकरे सरकारच्या निर्णयावर टीका केली. महाराष्ट्र सरकार सुडाच्या भावनेतून भाजपा नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्याचे दुस्साहस करत आहे. जर सुरक्षा कपाती नंतर काही बर वाईट झाल तर त्याची सर्वस्वी जबाबदारी MVA ची असेल हे याद राखा. आणखी कोणा कोणाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करणार? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!