Share

…तर राज्य सरकारने दोन दोन हात करण्याची हिंमत दाखवावी- भास्कर जाधव

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला २२ डिसेंबरपासून सुरुवात झाली असून आज(२८ डिसें.)हे अधिवेशन संपणार आहे. आज या अधिवेशनाचा शेवटचा दिवस असला तरी अद्यापही विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी(Bhagat Singh Koshyari) यांनी तारीख निश्चित केलेली नाही. असे असले तरी ही निवडणूक आज घेण्याबाबत महाविकास आघाडीचे नेते ठाम आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेना नेते भास्कर जाधव(Bhaskar Jadhav) यांनी माध्यमांशी संवाद साधताना याविषयी भाष्य केले आहे.

यासंदर्भात आज सकाळी प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना भास्कर जाधव म्हणाले की,’कधीतरी हा सामना सरकारला करावाच लागेल. राज्यपाल हे केंद्र सरकार किंवा राज्य सरकारचे नोकर नसून भारतीय राज्यघटनेच्या कलम १७८ नुसार त्यांनी संवैधानिक शपथ घेतलेली असते. त्यामुळे भारतीय संविधान जे सांगते, त्यानुसार राज्यपाल वागत नसतील, तर राज्य सरकारने दोन दोन हात करण्याची हिंमत दाखवावी, असे माझे वैयक्तिक मत आहे’, असे जाधव यावेळी म्हणाले आहेत.

दरम्यान, याच मुद्द्यावरून शिवसेना खासदार संजय राऊत(Sanjay Raut) यांनी देखील माध्यमांशी संवाद साधला असून ते म्हणाले आहेत की,’मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाठवलेले उत्तर तुमच्या समोर आहे. राज्यपालांनी इतका अभ्यास करु नये असे मी कालही म्हणालो होतो. घटनेमध्ये ज्या तरतुदी आहेत त्यानुसार काम करण्यासाठी राज्यपालांची नेमणुक होते. विधानसभेचे हक्क, सरकारच्या शिफारसी, लोकभावना डावलून काम करण्यासाठी राज्यपालांची नियुक्ती होत नाही. राज्यपाल अभ्यासू, विद्वान आहेत. पण त्या अभ्यासाचे आणि विद्वत्तेचे अजीर्ण होऊ नये. महाराष्ट्राच्या राजभवनामध्ये अभ्यासाचे अजीर्ण झाले आहे. अजीर्ण झाल्यावर पोटाचा त्रास सुरु होतो. असा त्रास जर काही लोकांना झाला असेल महाराष्ट्राचे आरोग्य खातं सक्षम आहे. ते उपचार करतील’, असे राऊत म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!