Share

‘ज्या भूमिपुत्रांनी जमिनी दिल्या त्यांच्या भावनांची कदर राज्यकर्त्यांनी केली पाहिजे’

Published On: 

मुंबई : नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा.पाटील यांचे नाव द्यावे या मागणीने जोर पकडला आहे. राजकीय पक्ष आणि अनेक समाजिक संघटना ही मागणी करताना दिसून येत आहेत. लोकनेते दि. बा.पाटील यांचे नाव विमानतळाला देण्यासाठी यापूर्वी राज्य आणि केंद्र सरकारकडे विनंती करण्यात आलेली आहे. तरी देखील अचानकपणे 17 एप्रिल रोजी सिडकोच्या संचालक मंडळाने लोकभावनेचा विचार न करता शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे.

नवी मुंबई विनानतळाला दि.बा.पाटील यांचं नाव देण्याची मागणी स्थानिक भूमिपुत्रांनी केली आहे. त्यावर या विमानतळाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्यात आल्याचं नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलं आहे. यावरून आता राजकारण चांगलेच तापायला सुरु झाले आहे. दरम्यान यासाठी आता रायगड, ठाणे, पालघर, कल्याण याठिकाणी हि चळवळ निर्माण झाली आहे. येत्या २४ तारखेला प्रकल्पग्रस्तांनी सिडकोला घेराव घालण्याचा देखील निर्धार केला असून भाजपचे विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी स्थानिक जनभावनेचा विचार करून विमानतळाला दि.बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी केली आहे.

तसेच यावेळी दरेकर बोलताना म्हणाले कि, ‘नवी मुंबईच्या इतिहासात दि. बा. पाटील यांचे बहुमोल योगदान राहिले आहे. नवी मुंबईसाठी ज्या भूमिपुत्रांनी जमिन दिल्या, त्या प्रकल्पग्रस्तांच्या न्याय हक्कांसाठी जो लढा झाला, त्याचे नेतृत्व पाटील यांनी केले होते. या पार्श्वभूमीवर स्थानिक भूमिपुत्रांचे समाजभूषण दि. बा. पाटील यांचे नाव विमानतळाला देण्याची मागणी अत्यंत रास्त आणि न्याय्य आहे. पूर्वजांकडून मिळालेल्या प्राणप्रिय जमिनी विमानतळासाठी देणाऱ्या भूमिपुत्रांच्या भावनांची कदर राज्यकर्त्यांनी केली पाहिजे. त्यामुळे नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे, असे दरेकर यांनी सांगितले.

दरम्यान काही दिवसांपूर्वी ठाणे, पालघर, रायगड या परिसरात १० जून रोजी भू्मीपत्रांनी मानवी साखळी आंदोलन केले. त्यानंतर आत्ता सिडकोला घेराव घालण्यासाठी 24 जून रोजी आंदोलन केले जाणार आहे. त्यामुळे आगामी काळात हा वाद अधिक चिघळणार असल्याचे चिन्हे दिसू लागले आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!