🕒 1 min read
मुंबई : शिवसंग्रामचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी आज कुलाबा कफ परेड येथे जाऊन शिवस्मारकाच्या कार्यालयाची पाहणी केली. यावेळी त्यांनी कुलाब्यातील शिवस्मारकाच्या ऑफिसला गळती लागल्याचे पाहून नाराजी व्यक्त केली. तसेच शिवस्मारकाचे काम तत्काळ सुरू करा, अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असा इशारा मेटे यांनी दिला.
मुंबईत उभारण्यात येणाऱ्या शिवस्मारकाच्या ऑफिसची आघाडी सरकारमुळे दुरावस्था झाली आहे. दीड वर्षात आघाडीचा एकही नेता या ऑफिसची पाहणी करण्यासाठी फिरकला नाही. ऑफिसला गळती लागली आहे. पडझड सुरू आहे. कार्यालयात काहीच शिल्लक राहिलं नाही. हे कार्यालय सामान्य प्रशासन विभागाच्या ताब्यात असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे या विभागाचे प्रमुख आहेत. मात्र, त्यांचंच या कार्यालयाकडे दुर्लक्ष होत आहे, अशी टीका विनायक मेटे यांनी यावेळी केली.
मुख्यमंत्र्यांनी गड-किल्ल्यांची माहिती मागवण्याचे काम सुरू केलं आहे. ही आनंदाची गोष्ट आहे. पण स्मारकासाठी काहीच हालचाल सरकारकडून झालेली नाही. या सरकारला केवळ मते हवी आहेत. त्यांना स्मारकाच्या कामाचं काहीही पडलेलं नाही. याला मुख्यमंत्री ठाकरे आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाणच जबाबदार आहेत, असा आरोप त्यांनी केला.
स्मारकाच्या कामाकडे दुर्लक्ष हे महाराष्ट्राचे दुर्दैव
२००५ ला स्मारकाला मान्यता मिळाली. फडणवीस सरकाने स्मारकाला गती देण्याचे काम केले. ठाकरे सरकारने स्मारकाचे काम कुठे अडकले आहे, यासाठी एकही बैठक घेतलेली नाही. स्मारकाच्या कामाकडे दुर्लक्ष हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. त्यातच सामान्य प्रशासनाकडे स्मारकाचे काम आहे आणि हे खाते मुख्यमंत्री यांच्याकडे असूनही दुर्लक्ष होत असल्याचे मेटे यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या
- ‘परिचारिकांवर कोणाच्या आदेशाने लाठीचार्ज केला?’, अजित पवारांनी दुर्लक्ष केल्याने भाजप आक्रमक
- अजित पवारांच्या बैठकीदरम्यान घोषणाबाजी करणाऱ्या कंत्राटी परिचारिकांवर लाठीचार्ज
- ‘तुला प्रोटोकॉल कळतो का रे?’, अजित पवारांनी बीडच्या मुख्याधिकाऱ्यांना झापले
- ‘तुम्ही काळजी करू नका, आमचं व्यवस्थित सुरुये!’, आघाडीत बिघाडीच्या चर्चेवर अजितदादांचे स्पष्टीकरण
- नितीन गडकरींना धक्का! अमरावतीचे डॉ.सुनील देशमुख काँग्रेसमध्ये
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
