Share

‘या’ कंपनीचा तर रुबाब न्यारा ! ; मनी हाइस्ट सिरीज पाहण्यासाठी कंपनीने दिली सर्व कर्मचाऱ्यांना सुट्टी

Published On: 

🕒 1 min read

जयपूर : सतत काम केल्याने कंटाळा येतो, कामाचा दबाव कमी करण्यासाठी विविध पद्धती आढळतात. जयपूरस्थित एका कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना असाच आनंदाचा क्षण दिला आहे. आता वेर्वलोजिक या जयपूर मध्ये असणाऱ्या कंपनीने कोरोनाच्या काळात कामाचा ताण कमी करण्यासाठी आपल्या कर्मचाऱ्यांकडून सुट्टी जाहीर केली आहे जेणेकरून कर्मचारी मनी हाइस्ट या वेब सीरिजचा नवीन सीझन पाहू शकतील. मनी हेस्ट ही नेटफ्लिक्सवरील एक अशी वेब सिरीज आहे जी लोकांना खूप आवडली होती.

मनी हाइस्ट या प्रसिद्ध वेबसीरिजचा पाचवा सीझन 3 सप्टेंबरला प्रदर्शित होतो आहे. तो पाहण्यासाठी कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना सुट्टी दिली आहे. या ‘सरप्राइज सुट्टी’बाबत कंपनीने कर्मचाऱ्यांना पत्र पाठवलं आहे. हे पत्र सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

या कंपनीचे सीईओ अभिषेक जैन यांनी हे पत्र लिहिलं आहे. सप्टेंबरला मनी हाइस्ट सीझन 5 रिलीज होत आहे. या निमित्ताने कंपनीने ‘नेटफ्लिक्स अँड चिल’ नावाने विशेष सुट्टी जाहीर केली आहे. सुट्टी घेण्यासाठी खोटी कारणं देणं, कुणालाही न सांगता ठरवून ऑफिस बंक करणं, ऑफिसला न येता फोन स्विच ऑफ करून बसणे अशा गोष्टी टाळण्यासाठी आम्ही ही सुट्टी जाहीर केली आहे. असे देखील त्यांनी सांगितले आहे.

खरतर घरून काम केल्यानंतर, जेव्हा दोन महिने कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना वेब सीरिज पाहण्यासाठी सुट्टी मिळाली आहे. हे समजल्यानंतर त्यांच्या आनंदाला सीमा नव्हती. दरम्यान आता वेब सिरीज पाहण्यासाठी दिलेल्या या सुट्टीची चर्चा सर्वत्र होत असल्याचे पहायला मिळत आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!