Share

आरटीओ कार्यालयाची फसवणूक! बनावट कागदपत्राच्या सहाय्याने रिक्षा स्क्रॅप केल्याचा अहवाल केला सादर

Published On: 

औरंगाबाद : आरटीओ कार्यालयाने रिक्षा स्क्रॅप (भंगार) करण्याची परवानगी दिल्यावर बनावट कागदपत्राच्या सहाय्याने रिक्षा स्क्रॅप केल्याचा अहवाल सादर करून आरटीओ कार्यालयाची फसवणूक केल्याप्रकरणात वेदांतनगर पोलिसांनी आणखी एका आरटीओ एजंटला मंगळवारी दि.१८ सायंकाळी गजाआड केले. मोहम्मद कलीमोद्दीन मोहम्मद युसूफोद्दीन (४२, रा. गणेश कॉलनी) असे एजंटचे नाव असून त्याला शुक्रवारपर्यंत दि.२१ पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए.एन. माने यांनी बुधवारी दि.१९ दिले.

गुन्ह्यात यापूर्वी आरटीओ एजंट मिर्झा अकबर बेग आणि बनावट चेसीस क्रमांक बनवुन देणारा आरोपी शेख फारुक याला अटक करण्यात आली. तर न्यायालयाने त्यांची पोलीस कोठडीनंतर न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.

प्रकरणात प्रादेशीक परिवहन कार्यालयाचे मोटार वाहन निरीक्षक रविंद्र दत्तात्रय नारळे (36) यांनी फिर्याद दिली. त्यानूसार शेख कमरोद्दीन शेख ईस्माईल (रा.मकसुद कॉलनी, रोशनगेट) व त्याच्या साथीदारांविरोधात वेदांतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्ह्याचा तपासा दरम्यान पोलिसांनी बनवाट अहवाल, स्वाक्षरी, शिक्का व रिक्षा स्क्रॅप केल्याचा एडीट केलेला फोटो बनवून देणारा तनवीर उर्फ मोहम्मद कलीमोद्दीन याला अटक केली. तसेच त्याच्या रोशनगेट येथील तनवीर कलर प्रिंटर्स अॅण्ड वर्कर नावाच्या दुाकनाची झडती देखील घेतली.

आरोपीला आज न्यायालयात हजर करण्यात आले असता, सहायक सरकारी वकील एस.आर. ढोकरट यांनी आरोपीचे स्वाक्षरीचे नमुने तपासणे आहे. आरोपीच्या दुकानाच्या झडतीत स्वाक्षरीचा सराव केलेला पेपर मिळाला असून त्या अनुषंघाने तपास करणे आहे. आरोपीला दुकानातील संगणकाच्या हार्डडिस्क बाबत तपास करुन ती जप्त करणे आहे. तसेच गुन्ह्यात वापरलेले शिक्के जप्त करणे आहे. गुन्ह्यात रिक्षाच्या बनावट स्क्रप अहवाला व्यतिरिक्त आणखी ३२ बनावट अहवालाची कागदपत्र तपासादरम्यान उघड झाली आहे. त्यापैकी कितीन बनावट अहवाल आरोपीने तयार केले याचा देखील तपास बाकी असल्याने आरोपीला पोलीस कोठडी देण्याची विनंती न्यायालयाकडे केली.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!