Share

Ajit Pawar | “आता मी अमृता वहिनींनाच सांगणार आहे…”, अजित पवारांची जोरदार टोलेबाजी

Published On: 

Ajit Pawar | नागपूर : विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत जोरदार भाषण केले. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टोलेबाजी केली. अजित पवार यांनी मंत्रिमंडळाच्या महिलांच्या संख्येवर प्रश्न उपस्थित केले.

अजित पवार म्हणाले, “सध्या मंत्रिमंडळात एकही महिला मंत्री नाही अशी नामुष्की सरकारवर ओढावली आहे. सरकारला एक महिला मंत्री नेमता येत नाही हा तर महिलांचा अपमान आहे. मी आता तर अमृता वहिनींनाच फोन करुन सांगणार आहे की यांच्याकडे बघा जरा”

अजित पवार यांच्या या वक्तव्यानंतर सभागृहात एकच हशा पिकला. काहीतरी करा रात्रीच्या रात्री दिल्लीला फोन लावा आणि उध्याच्या उद्या मंत्रिमंडळाचा विस्तार करा, असा चिमटा अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारला काढला.

अजित पवार म्हणाले, सरकार येऊन सहा महिने लोटले तरी अनेक खात्यांना मंत्री यांना मिळेत नाहीत. अनेक कामे रखडली आहेत. आता कुणी कितीही गप्पा केल्या तरी भाजपमध्ये देवेंद्र फडणवी सर्वात ताकदवान नेते आहेत. भाजपच्या मंत्र्यांना काही काम सांगितलं की फडणवीसांना विचारुन सांगतो असे उत्तर मिळते.

महत्वाच्या बातम्या :  

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!