Share

अमृतमहोत्सवानिमित्त सरसंघचालक मोहन भागवत बीडमध्ये येणार

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत 30 डिसेंबरला अंबाजोगाईत येत आहेत. ज्येष्ठ इतिहास संशोधक प्रा. डॉ. शरदराव हेबाळकर यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त कार्यक्रमास भागवत यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. 29 व 30 डिसेंबर २०१९ असे दोन दिवसीय अमृत महोत्सवात विविध कार्यक्रम होणार आहेत. यावेळी शांतियज्ञ होणार असल्याचे प्रसाद चिक्षे यांनी सांगितले.

डॉ. शरदराव हेबाळकर हे भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे माजी कार्यवाह आणि खोलेश्वर महाविद्यालयाचे उपप्राचार्य राहिलेले आहेत. संघप्रणित इतिहास संकलन समितीचे ते केंद्रीय सदस्यही आहेत. यज्ञेश्वरशास्त्री सेलूकर महाराज यांच्या उपस्थितीत 29 डिसेंबरला हा कार्यक्रम होणार आहे.

राष्ट्रीय सेविका समितीच्या संचालिका शांताक्का यांचीही प्रमुख उपस्थिती राहील. येथील स्वयंवर मंगल कार्यालयात होणाऱ्या कार्यक्रमाची सांगता 30 डिसेंबरला दुपारी चारला होणार आहे. याच कार्यक्रमास सरसंघचालक मोहन भागवतांची उपस्थिती राहणार आहे. राज्यातून येणारे संघ प्रचारक, कार्यकर्ते व परिवारातील सर्व सहकाऱ्यांना ते मार्गदर्शन करणार आहेत.

महत्वाच्या बातम्या 

https://twitter.com/Maha_Desha/status/1206554096678797312?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1206553852700311552?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!