Share

आरसाबीची विजयी घौडदौड कायम; राजस्थानविरुद्ध १० गडी राखुन मिळवला ‘रॉयल’ विजय

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आयपीएलमध्ये गुरुवारी झालेल्या सामन्यात विराट कोहलीच्या रॉयल्स चॅलेंजर बेंगळुरुने राजस्थान रॉयल संघाचा १० गडी राखुन पराभव केला. या विजयासह आरसीबीची विजयी घौडदौड कायम आहे. आरसीबी संघाचा स्पर्धेतील हा सलग चौथा विजय आहे.

नाणेफेक जिंकल्यानंतर कर्णधार कोहलीने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधार कोहलीचा निर्णय सार्थ ठरवत सीराजने तिसऱ्याच षटकांत सलामीवीर जोस बटलर(८) आणि डेव्हिड मिलर(०) दोघांना बाद करत राजस्थानला चांगली सुरुवात करुन दिली. राजस्थानच्या ४३ धावा झाल्यावर कर्णधार सॅमसन(२१) बाद झाल्यावर शिवम दुबे(४६), रियान पराग(२५) आणि राहुल तवेतिया(४०) यांनी संघाचा डाव सावरला. निर्धारित २० षटकात राजस्थानचा संघ १७७ धावांपर्यत मजल मारली. आरसीबीकडून सिराज आणि हर्षद पटेल दोघांनी प्रत्येकी ३ गडी बाद केले.

राजस्थानच्या १७८ धावांचा पाठलाग करायला उतरलेल्या आरसीबी संघाने राजस्थानच्या संघाला संघर्ष करण्याची संधीच दिली नाही. आरसीबीच्या दोन्ही सलामीवीर विराट कोहली आणि देवदत्त पड्डिक्कल यांनी सुरुवातीपासुनच आक्रमक फंलदाजी करत राजस्थानच्या आव्हानातील हवा काढुन घेतली. दोघांनी नाबाद १८१ धावांची भागिदारी करत सतराव्या षटकातच राजस्थान रॉयल्स संघाचा १० गडी राखुन दणदणीत विजय मिळवला. सलामीवीर देवदत्त पड्डिकलने नाबाद शतकी खेळी केली. त्याने ५२ चेंडुत ११ चौकार आणि ६ षटकारासह १०१ धावांची खेळी केली. तर विराट कोहलीने ४७ चेंडुत ७२ धावांची खेळी केली. शतक झळकावणाऱ्या पड्डिक्कलला सामनावीराच्या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!