🕒 1 min read
औरंगाबाद : गेल्या अनेक महिन्यांपासुन सिडको-हडको या भागातील पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. त्यामुळे याची गंभीर दखल घेण्याची मागणी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केली. गुरुवारी (दि.२२) मनपा आयुक्त व प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांची शिवसेना शिष्टमंडळाने भेट घेत आपल्या समस्या मांडल्या.
सिडको हडको भागातील पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी काही उपाय योजना तातडीने करण्याची गरज आहे. जायकवाडी पैठण येथुन येणाऱ्या पाण्याबाबतची सविस्तर माहिती घ्यावी. सिडको-हडको या भागाला समाधानकारक पाणी पुरवठा वितरण होत नाही ही वस्तुस्थिती आहे. या भागात होणारा पाणी पुरवठा हा कोणत्या ठिकाणी मोजमाप केला जातो याची निश्चित माहिती कोणालाच नाही. त्यामुळे पाणी पुरवठ्याचे मुल्यमापन होत नाही.
नक्षत्रवाडी (एम.बी.आर.) ते एन-५ येथील पाण्याच्या टाकीपर्यंत किती व कोणत्या भागाला किमी एम.एल.डी. पाणी पुरवठा होत आहे. यावर संबंधित अधिकार्याचे नियंत्रण नसल्याने सिडको-हडको भागातील पिण्याच्या पाण्याची गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे. एन-५ येथील पाण्याच्या टाकीवरुन एन-७ येथील टाकीपर्यंत किती एम.एल.डी. पाणी पुरवठा होतो याचे सुध्दा व्यवस्थित नियोजन करुन सर्व मुद्यांची आपण शहानिशा करुन सिडको-हडको या भागातील पाणी पुरवठा लवकरात लवकर सुरळीत करावा, अशा सूचना शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, महापौर नंदकुमार घोडेले, उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांनी केल्या.
महत्त्वाच्या बातम्या
- कोरोना रूग्णांसाठी शहरात पहिली प्लाझ्मा बँक, ८५ दात्यांची नोंदणी
- ‘..पण माणुसकी जिवंत राहिली पाहिजे’, तीन हजार अंत्यविधी करणारे ‘मस्तान’ गहिवरले
- मुलांना शिव्या द्यायचे शिकवते म्हणून महिलेचे पतीसमोरच सिनेस्टाईल अपहरण
- सलाम पुणेकर : सलग चौथ्या दिवशी कोरोनामुक्त संख्या अधिक !
- शहर विकासावर खा इम्तियाज जलील यांची मनपा आयुक्तांशी चर्चा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
