मुंबई : आयपीएलच्या १४ व्या हंगामाची सध्या धुमशान सुरु आहे. यंदा आयपीएलचे विजेतेपद कोणाकडे जाणार यावरून उत्सुकता शिगेला पोहोचली असून कोरोनाच्या सावटामुळे मोजक्याच स्टेडियमवर सामने खेळवले जात आहेत. आज रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि राजस्थान रॉयल्समध्ये चुरशीची लढत पाहायला मिळत आहे.
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने या हंगामात तीन पैकी तीनही सामने जिंकले असून राजस्थान समोर त्यांची विजयी घौडदौड रोखण्याचा महत्वाचं आव्हान आहे. हा विजय राजस्थानची महत्वाचा असून राजस्थानला पहिली फलंदाजी करावी लागली आहे. दरम्यान, टॉस वेळी असं काही घडलं की त्याची चर्चा सध्या सुरु आहे. आरसीबीचा कर्णधार विराट कोहली आणि राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन नाणेफेकीसाठी मैदानावर आले होते.
यावेळी, विराट कोहलीने नाणेफेक जिंकली मात्र तो यानंतर गोंधळल्याचं दिसून आलं. नाणं खाली पडल्यानंतर विराट कोहली टॉस जिंकला मात्र त्याने संजू सॅमसनला पुढे केलं. संजूदेखील समलोचकांच्या समोर आला, तोवर दोघांच्याही लक्षात आलं की टॉस विराटने जिंकला होता. यानंतर माफी मागत विराट समोर आला आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय जाहीर केला. यावेळी, विराटच्या गोंधळामुळे समालोचक, संजय आणि खुद्द विराटला देखील हसू आवरलं नाही. टॉस जिंकण्याची सवय नाही, असं विराट कोहली म्हणाला. दरम्यान, राजस्थानने १७७ धावा केल्या असून आरसीबीला विजयासाठी १७८ धावांची गरज आहे.
"I'm not used to winning tosses" ???? @imVkohli #RCB have the toss and they will bowl first against #RR #VIVOIPL pic.twitter.com/a0bX6JNGak
— IndianPremierLeague (@IPL) April 22, 2021
महत्त्वाच्या बातम्या
- कोरोना रूग्णांसाठी शहरात पहिली प्लाझ्मा बँक, ८५ दात्यांची नोंदणी
- ‘..पण माणुसकी जिवंत राहिली पाहिजे’, तीन हजार अंत्यविधी करणारे ‘मस्तान’ गहिवरले
- मुलांना शिव्या द्यायचे शिकवते म्हणून महिलेचे पतीसमोरच सिनेस्टाईल अपहरण
- सलाम पुणेकर : सलग चौथ्या दिवशी कोरोनामुक्त संख्या अधिक !
- शहर विकासावर खा इम्तियाज जलील यांची मनपा आयुक्तांशी चर्चा


