Share

‘रसवंतीचालकांसह ऊस उत्पादकांना आर्थिक पॅकेज द्या’, आ.श्वेता महालेंची मागणी

Published On: 

🕒 1 min read

बुलडाणा : जिल्ह्यासह राज्यभरातील लाखो शेतकरी उसाची लागवड करून रस्त्याच्या कडेला रसवंतीची दुकाने लावून रस विकून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. मागील वर्षी लॉकडाऊन काळात रसवंती ठप्प होत्या. त्यामुळे लाखो शेतकरी व रसवंतीचालकांना मोठी झळ पोहोचली होती. यावर्षी लॉकडाऊन जाहीर केल्याने सर्व रसवंतीची दुकाने बंद झाल्याने रसवंती चालकांसोबतच ऊस पिकविणाऱ्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होतेय. त्यामुळे त्यांना रसवंती सुरू ठेवण्याची परवानगी देऊन आर्थिक पॅकेज द्यावे, अशी मागणी चिखलीच्या भाजप आ.श्वेता महाले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

याबाबत त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्या म्हणतात की, मागील वर्षी लॉकडाऊनमुळे तालुक्यासह जिल्ह्यातील लागवड केलेला ऊस तसाच वाळून गेला. यावर्षी सुद्धा संचारबंदी केल्याने रसवंती चालकांचा व्यवसाय बंद झाल्याने ऊस उत्पादकांचा लागवड केलेला ऊस आता तसाच पडून राहणार आहे. त्यामुळे रसवंती चालक व ऊस उत्पादक शेतकरी यांचे फार मोठे नुकसान होणार आहे.

https://www.facebook.com/shweta.mahale.patil/posts/5457354937669725

रसवंतीची बहुतांश दुकाने ही गावाच्या बाहेर आहे. गावात किंवा शहरात असणारी दुकानात गर्दी होते असे कुठेही चित्र कोणत्याही रसवंतीमध्ये कधी पहायला मिळाले नाही. रसवंती चालकांनी प्रत्येक ग्राहकांना बसण्याची स्वतंत्र व्यवस्था केलेली असते. तसेच राज्य महामार्ग किंवा इतर रस्त्याच्या कडेला असणारी दुकाने ही तर येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांच्याच भरवशावर चालतात. त्यामुळे संचारबंदी किंवा लॉकडाऊन काळात रसवंती चालकांना रसवंती सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात यावी.

तसेच संचारबंदी काळात व्यवसाय ठप्प होत असल्याने आणि पर्यायाने ऊस उत्पादनाची कमी खपत होत असल्याने रसवंती चालक ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक पॅकेज देण्याची व शेतकऱ्यांचा पडून असलेला ऊस साखर कारखान्याला देण्याची व्यवस्था करण्याचीसुद्धा मागणी आ. महाले यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!